महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चीनकडून डब्ल्यूएचओची पाठराखण...तर संघटनेतून बाहेर पडल्यामुळे अमेरिकेवर टीका

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडल्यामुळे विकसनशील देशांवर परिणाम होईल. त्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्यात अडथळे येतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन म्हणाले.

झाओ लिजिन
झाओ लिजिन

By

Published : Jul 9, 2020, 2:06 PM IST

बीजिंग - कोरोना विषाणूच्या प्रसारास चीन जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेने महामारीच्या सुरुवातीपासूनच केला आहे. कोरोनाच्या प्रसारासाठी जागतिक आरोग्य संघटनेलाही जबाबदार असल्याचे म्हणत अमेरिका डब्ल्यूएचओमधून बाहेर पडली आहे. मात्र, चीनने डब्ल्यूएचओची पाठराखण करत अमेरिकेवर टीका केली आहे. जगातील बलाढ्य अर्थव्यवस्था आणि भू-राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये वाद वाढल्याचे चीनने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडली. या घटनेतून अमेरिकेची एकतर्फी निर्यण घेण्याची सवय दिसून येते. डब्ल्युएचओतून बाहेर पडल्यामुळे अमेरिकेने अनेक करारही मोडले आहेत. जागतिक आरोग्य सुरक्षेसाठी डब्ल्यूएचओ ही अधिक विश्वासार्ह आणि व्यावसायीक दृष्टीकोनातून काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे विकसनशील देशांवर परिणाम होईल. त्यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळण्यात अडथळे येतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन म्हणाले.

कोरोनाचा उगम कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी एक पथक चीनला पाठविण्याचे नियोजन डब्ल्यूएचओ करत आहे. मागील वर्षी वुहानमध्ये पहिल्यांदा कोरोना विषाणू सापडला. विषाणूचा कोठून प्रसार झाला. हे स्पष्ट नाही. चीनने कोरोना प्रसाराची स्वतंत्र चौकशी करण्यास नकार दिला आहे. मात्र, डब्ल्यूएचओ आणि शास्त्रज्ञांशी मिळून कोरोनाच उगम कसा झाला, या शोध घेण्याचा प्रयत्न चीन करत आहे, असे झाओ लिजिन म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटना चीनच्या दबावाखाली असून कोरोना फैलावाचे व्यवस्थापन करण्यास अपयशी झाली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्याचे चीनने डब्ल्यूएचओला लवकर सांगितले नाही, त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर फैलाव झाल्यानंतर नागरिकांना चुकीची माहिती दिली. चुकीची माहिती देण्यासाठी चीनने डब्ल्यूएचओवर दबाव आणला, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details