महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

चेन्नईच्या विजयाची घोडदौड कायम, कोलकात्याचा केला ५ गडी राखून पराभव

चेन्नईकडून इम्राम ताहिरने ४ षटकात २७ धावात ४ गडी बाद केल्याने कोलकाताला मोठ्या धावासंख्या बनविण्यापासून रोखले.

चेन्नईचा विजयी संघ

By

Published : Apr 14, 2019, 3:56 PM IST

Updated : Apr 14, 2019, 11:22 PM IST

कोलकाता - टी-२० स्पेशालिस्ट सुरेश रैनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने आपला विजयी धडका कायम ठेवला आहे. ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर ५ गडी राखून मात केली.

कोलकाताने ख्रिस लीनच्या ताबडतोब ८२ धावांच्या जोरावर चेन्नईपुढे विजयासाठी १६२ धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताने निर्धारित २० षटकात ८ बाद १६१ धावा केल्या. चेन्नईने हे आव्हान १९.४ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

१६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. कोलकात्याच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केल्याने शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि केदार जाधव हे फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर रैना आणि धोनी जोडीने भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. धोनीला माघारी परतल्यावर रैनाने रविंद्र जाडेजाच्या साथीने संघाची अधिक पडझड होऊ न देता विजय मिळवला.

कोलकात्याकडून पियुष चावला, सुनील नरेन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्याला हॅरी गुर्नीने एक बळी घेत सुरेख चांगली साथ दिली.

चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ख्रिस लीनने ५१ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यात ७ चौकार आणि ६ षटकार ठोकल्या. लीनने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चेन्नईकडून इम्राम ताहिरने ४ षटकात २७ धावात ४ गडी बाद केल्याने कोलकाताला मोठ्या धावासंख्या बनविण्यापासून रोखले.


नीतिश राणा २१, दिनेश कार्तिक १८ आणि शुभमन गिलने १५ धावा केल्या.चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने २ तर मिचेल सँटनर यास एक गडी बाद करण्यात यश आले.

Last Updated : Apr 14, 2019, 11:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details