महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अकोला प्रशासनाची लगबग; कर्मचाऱ्यांना साहित्यांचे वाटप

राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या 1 हजार 751 मतदान केंद्रावर होत आहे. या मतदान केंद्रावर 7 हजार 4 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी अकोला प्रशासनाची लगबग

By

Published : Apr 17, 2019, 1:50 PM IST

अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघात उद्या (18 एप्रिल) मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. आज सकाळपासून मतदान केंद्राधिकारी यांच्या पथकाला मतपेटीसह आवश्यक त्या साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय आणि वसंत देसाई क्रीडांगण येथे या साहित्यांचे वितरण करण्यात आले.

दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी अकोला प्रशासनाची लगबग

राज्यातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या 1 हजार 751 मतदान केंद्रावर होत आहे. या मतदान केंद्रावर 7 हजार 4 कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पोलीसही सज्ज झाले आहेत. आज मतदान केंद्रावरील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना मतपेटी, व्हीव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहे.

मतदान प्रक्रिया व्यवस्थित व विहित मुदतीत पार पाडण्यासाठी 30 विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. अकोला पोलीस, राज्य राखीव दल, गृहरक्षक दल यांच्यासह इतर जिल्ह्यातील पोलीसही निवडणूक बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचारी यांना पोहचवण्यासाठी एसटी बसेस, खासगी शाळांची बसेस, खासगी वाहने यांचा उपयोग करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त निवडणूक विषयक कोणतीही तक्रार असल्यास 1950 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details