महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

संतापजनक...! झारखंडमध्ये उपचार न मिळाल्याने बीएसएफ जवानाचा मृत्यू

परिवाराने डॉक्टरांना उदय शंकर यांचा इलाज करावा अशी विनंती केली, मात्र कोरोनाचे कारण पुढे करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. उपचार न मिळाल्यामुळे पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखतच उदय शंकर यांनी आपला प्राण सोडला.

By

Published : Jul 26, 2020, 6:46 PM IST

Bsf Jawan death Bokaro hospital
बीएसएफ जवान मृत्यू

बोकारो (झारखंड)- बोकारो येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील बोकारो रुग्णालयात उपचार न मिळाल्याने बीएसएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे.

उदय शंकर, असे मृत बीएसएफ जवानाचे नाव आहे. ते बोकारो सेक्टर 9 येथील रहिवाशी असून पश्चिम बंगालच्या सीटी (जीडी) येथील बीएसएफच्या पोस्टवर तैनात होते. उदय शंकर यांची 22 जून रोजी प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना बोकारो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. भरती केल्याच्या 24 तासानंतर उदय शंकर यांचे कोरोना चाचणी नमुने घेण्यात आले. मात्र, त्यानंतर कुठल्याही प्रकारची तपासणी करण्यास डॉक्टरांनी नकार दिला होता. त्यामुळे, उदय शंकर यांच्या परिवाराने बाहेरून शुगर आणि बीपी किट आणून त्यांची तपासणी केली. यात त्यांना उच्च बीपी आणि शुगर प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर परिवाराने डॉक्टरांना उदय शंकर यांचा इलाज करावा अशी विनंती केली, मात्र कोरोनाचे कारण पुढे करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला. उपचार न मिळाल्यामुळे पत्नी आणि मुलांच्या डोळ्यादेखतच उदय शंकर यांनी आपला प्राण सोडला.

याप्रकरणी उदय शंकर यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या मृत्यूसाठी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसना जबाबदार धरले आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details