महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टेस्टिंग लॅबमधील 8 कर्मचारी पॉझिटिव्ह, लॅब बंद

सध्या लॅबचे काम सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. इतर कर्मचाऱ्यांना या संदर्भातील ट्रेनिंग दिली जात असून साधारण उद्यापासून टेस्टिंग लॅब सुरू होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Jul 1, 2020, 3:22 PM IST

धुळे- जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम कोरोना टेस्टिंग लॅबवर देखील झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना तपासणी लॅबमध्ये तब्बल 8 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सध्या लॅबमधील काम थांबवण्यात आले आहे. परिणामी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील कोरोना टेस्टिंगसाठी येणारे स्वॅब सध्या थांबविण्यात आले आहेत.

सध्या लॅबचे काम सुरू ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. इतर कर्मचाऱ्यांना या संदर्भातील ट्रेनिंग दिली जात असून साधारण उद्यापासून टेस्टिंग लॅब सुरू होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, टेस्टिंग थांबविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणीचे अहवाल हे प्रतिक्षेत आहेत. याचा परिणाम जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील रुग्णांवर होणार आहे. जिल्ह्यामध्ये सध्या करोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 131 वर जाऊन पोहोचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details