गडचिरोली- मंगळवारी रात्री गडचिरोलीत राज्य राखीव दलाचे तब्बल 71 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 424 वर पोहोचली आहे.
धक्कादायक...! गडचिरोलीत राज्य राखीव दलाचे तब्बल 71 जवान कोरोना पॉझिटिव्ह - Corona patients death Gadchiroli
कोरोनाबाधित आढळून आलेले राज्य राखीव दलाचे जवान हे धुळे येथून आलेले असून ते गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते. काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. 18 जुलैला राज्य राखीव दलाचे 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी संख्या आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 424 वर पोहोचली आहे.

कोरोनाबाधित आढळून आलेले राज्य राखीव दलाचे जवान हे धुळे येथून आलेले असून ते गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते. काल रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला. 18 जुलैला राज्य राखीव दलाचे 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतरची ही दुसरी मोठी संख्या आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 424 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 250 सक्रिय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत आढळलेल्या 424 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 286 रुग्ण हे राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान आहेत. जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. असे असले तरी सर्वाधिक रुग्ण पोलीस जवान असल्याने बाहेरून आलेल्या सर्व जवानांना विलगीकरणाता ठेवून खबरदारी बाळगली जात आहे.