महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

वाशिमच्या कार्ली विलगीकरण केंद्रामधील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

मुंबई, डोंबिवली येथे कामासाठी गेलेले एक कुटुंब वाशिम जिल्ह्यातील कार्ली येथे 17 जूनले आले होते. या कुटुंबातील 55 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावातील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते.

Karli
Karli

By

Published : Jun 23, 2020, 9:50 PM IST

वाशिम- जिल्ह्यातील कार्ली विलगीकरण केंद्रातील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला किडनी व हृदय संबधी त्रास होता. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे विलगीकरण केंद्रातील इतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोडक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांना गावांमधील विलगीकरण केंद्रांमध्ये ठेवण्यात येत आहे. मुंबई, डोंबिवली येथे कामासाठी गेलेले एक कुटुंब वाशिम जिल्ह्यातील कार्ली येथे 17 जूनला आले होते. या कुटुंबातील 55 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गावातील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. यातील किडनीच्या आजाराने ग्रस्त 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details