नाशिक- दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले 23 व्यक्ती तर वणी येथील एका बाधिताच्या संपर्कात आलेले 14, अशा एकूण 37 व्यक्तींना पिंपरखेडच्या कोविड केअर सेंटरमधे विलगीकृत करण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यात 37 कोरोना संभाविताचे विलगीकरण, प्रशासनाची जबाबदारी वाढली
निळवंडी येथील एका वृद्ध इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 23 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर आज वणी शहरातील 40 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
निळवंडी येथील एका वृद्ध व्यक्तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 23 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर आज वणी शहरातील 40 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेने बचत गटाची बैठक घेतल्याने बैठकीला उपस्थित असलेल्या 14 महिलांचे विलगीकरण करण्यात आले आहे.
सर्व महिलांना पिंपरखेड येथील कोविड सेंटर येथे पाठविण्यात आले असून सर्व महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगीतले.