महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / briefs

दिंडोरी तालुक्यात 24 तासात 16 जण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 79

दिंडोरी तालुक्यातील एकून रुग्णांची संख्या ही 79 झाली आहे. जिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 10 आहे. गोपेगाव कोविड सेंटरला उपचार घेणारे रुग्ण 27 असून कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 39 आहे. त्याचबरोबर, मृत रुग्णांची संख्या 3 असल्याची माहिती डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली.

Panchayat samiti dindori, corona update dindori
Panchayat samiti dindori, corona update dindori

By

Published : Jul 8, 2020, 6:49 PM IST

नाशिक- दिंडोरी तालुक्यात एकाच दिवशी 16 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यात एकेकाळी कोरोना प्रतिबंधासाठी कडक लॉकडाऊन ठेवणाऱ्या मोहाडीतील 13 रुग्ण, तर दहीवी, तिसगाव व लखमापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच, दिंडोरी तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण मोहाडीत सापडल्यामुळे मोहाडी हे कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे.

दिंडोरी तालुक्यातील दहीवी येथे एका भाजीविक्रेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर मोहाडी व तळेगाव-दिंडोरी येथील प्रत्येकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दोनच दिवसात 3 मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. गेल्या 24 तासात आढळलेले 16 रुग्ण हे सर्व जुन्या रुग्णाच्या संपर्कातील होते. ही बाब तालुक्याची चिंता वाढवणारी आहे. आता पुन्हा तालुक्यातील मोहाडीसहीत ज्या गावांमध्ये रुग्ण सापडले आहेत अशा गावांमध्ये काही दिवसांसाठी संपूर्ण जनता कर्फ्यू करावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, दिंडोरी तालुक्यातील एकून रुग्णांची संख्या ही 79 झाली आहे. जिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 10 आहे. गोपेगाव कोविड सेंटरला उपचार घेणारे रुग्ण 27 असून कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 39 आहे. त्याचबरोबर, मृत रुग्णांची संख्या 3 असल्याची माहिती डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली.

तसेच, सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. लहान मुले, जेष्ठ नागरिक तसेच विविध व्याधी असलेले नागरिक यांना कोरोना संसर्गाचा अति धोका आहे. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, अधीक्षक डॉ. विलास पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details