नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानीत होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावरून केंद्र सरकावर कडक ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी ऑक्सिजन पुरवठा केला नाही, त्यांना अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजवावी, असे निर्देशही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
दिल्लीमधील कोरोना संकटावरील व्यवस्थापनाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने सू मोटो दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयातील खंडपीठाचे न्यायमूर्ती विपीन संघी आणि रेखा पल्ली यांनी घेतली आहे. शहामृगाप्रमाणे तुम्ही वाळूत मान खुपसू शकता, आम्ही मात्र तसे करणार नाही, अशा कठोर शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले आहे. तुम्हा एकांतात राहता का? असा प्रश्नही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.
हेही वाचा-कोरोनाची दुसरी लाट : मे महिन्यातील जीईई-मेन्स परीक्षाही पुढे ढकलली!
बुधवारीपूर्वी म्हणणे सादर करण्याचे केंद्र सरकारला निर्देश-