नवी दिल्ली - दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी एका विशिष्ट थीम वर पर्यावरण दिन साजरा करण्याची परंपरा यंदा 50 वर्ष पूर्ण करत आहे. 'Only One Earth' या थीमवर यावर्षी पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे.
१९७२ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेम्ब्लीने स्टॉकहोम येथे झालेल्या परिषदेत या दिवसाची घोषणा केली होती. पर्यावरण संरक्षण या महत्त्वाच्या विषयावरील ही जगातली पहिलीच परिषद होती. ( World Environment Day 2022 ) जागतिक पर्यावरण दिन पहिल्यांदा १९७४ मध्ये साजरा झाला. हवेचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी समुद्रपातळी आदि विषयांवर जनजागृतीसाठी एक व्यासपीठ या दिवसाच्या निमित्ताने लाभले.
२०२२ मध्ये स्वीडन हा देश जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश आहे. स्वीडनमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना (World Environment Day 2022 Theme) आहे 'केवळ एकच पृथ्वी' (Only One Earth). या दिवसाचे सर्व महत्त्वाचे कार्यक्रम स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.
ओन्ली वन अर्थ या थीममागचा विचार आहे की शांतता आणि सलोख्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जगाने एकत्र येऊन काम करणे. पर्यावरणपूरक लाइफस्टाइल (lifestyle) तयार करण्यासाठी धोरण तयार होईल. या संकल्पनेमागचा उद्देश पृथ्वीचे संवर्धन हा आहे. पृथ्वी हे आपले एकमेव घर आहे आणि ते येणाऱ्या पिढ्यांसाठी जपले पाहिजे हा या संकल्पनेमागचा हेतू आहे.