कोइंबतूर : तामिळनाडू पोलिसांचा एक पथदर्शी कार्यक्रम म्हणून, महाविद्यालयांमध्ये महिला विद्यार्थिनींमधील लैंगिक छळ आणि भावनिक त्रासाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि समुपदेशन देण्यासाठी कोइंबतूरमध्ये 'पोलीस अक्का' (Police Sister) नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. कोइंबतूरमधील सर्व महाविद्यालयांसाठी एक महिला पोलीस संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
Police Sister : ही 'पोलीस अक्का' आहे तरी कोण? महाविद्यालयीन मुलींच्या संरक्षणासाठी नवीन योजना!
महाविद्यालयीन मुलींना (College Girls) भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तात्काळ सोल्यूशन मिळण्याच्या उद्देशाने कोईम्बतूर पोलिसांनी 'पोलीस अक्का' (Police sister) नावाची योजना सुरू केली आहे.
कोइंबतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाच्या माध्यमातून नियुक्त महिला पोलीस अधिकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. वेळोवेळी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्यांवर उपाय शोधतील. तसेच लैंगिक समस्या, औषधांची विक्री इ. समस्या तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यींनी दिलेली माहिती गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
या योजनेच्या माध्यमातून पोलीस अक्का (police sister) या महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या चांगल्या बहिणी म्हणून काम करणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ते आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसांतून एकदा महाविद्यालयांना भेट देतात. तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती विचारतात. कोइंबतूरचे पोलीस आयुक्त बालकृष्णन यांनी 18 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.