महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 27, 2023, 9:30 AM IST

ETV Bharat / bharat

Nitish Kumar Plan Anand Mohan Release : खून प्रकरणात आनंद मोहनची सुटका ; काय आहे नितीश कुमारचा आगामी गेमप्लॅन

बिहारमधील नेता आनंद मोहन हे तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांच्या खून प्रकरणात कारागृहात होते. मात्र नितीश कुमार सरकारकडून कारागृहाच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.

Nitish Kumar Plan Anand Mohan Release
आनंद मोहनची सुटका

पाटणा :तत्कालिन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या खुनाच्या गुन्हात दोषी ठरलेल्या आनंद मोहनची बिहार सरकारकडून मुदतपूर्व सुटका करण्यात आली आहे. आनंद मोहनची सुटका करण्यासाठी नितीश कुमार यांनी तुरुंगाचे नियम बदलले आहेत. आनंद मोहनच्या सुटकेची घाई झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नितीश कुमार सरकारने सोडलेल्या २७ बंदीवानांपैकी बक्सरमधील ९३ वर्षीय बंदीवानाचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मात्र आनंद मोहन यांच्या सुटकेबाबत बिहारमधील कोणत्याही राजकीय पक्षाचा आक्षेप नाही.

बिहारमधील राजपूत मतांची ताकद : बिहारमध्ये राजपूत ही एक प्रभावशाली जात असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना या समाजावर आपली पकड हवी आहे. बिहारमध्ये राजपूत लोकसंख्या ५ ते ६ टक्के आहे. बिहार विधानसभेच्या 30 ते 35 जागांवर आणि लोकसभेच्या 7 ते 8 जागांवर राजपूत समाजाची निर्णायक भूमिका आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या लढाईत या व्होटबँकेवर राजकीय पक्षांची नजर आधीपासूनच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आनंद मोहन यांची गरज वाढली आहे. प्रत्येकाला आनंद मोहनच्या ताकदीची कल्पना आहे. जातीबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न पक्ष करत असल्याने लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर होऊ शकतो असे मत राजकीय विश्लेषक कौशलेंद्र प्रियदर्शी यांनी व्यक्त केले आहे.

सवर्ण मतदारांना लक्ष्य :नितीश कुमार यांच्या पक्षाला सवर्ण नागरिकांची मते मिळत आहेत. पक्षांतर्गत अनेक राजपूत नेतेही आहेत. आनंद मोहन यांच्या बाजूने आवाज उठवून व्होट बँक मजबूत करण्याचा सुरुवातीपासूनच जेडीयूचा हेतू होता. दुसरीकडे भाजपही या आनंद मोहनमध्ये आपले भविष्य शोधत आहे. राजपूत हे भाजपचे मूळ मतदार आहेत. अशा स्थितीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत ही संधी हातातून निसटू द्यायची नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्या वक्तव्यावरून सध्या तरी असेच दिसते आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी आनंद मोहन यांना बळीचा बकरा केल्याचे म्हटले आहे. त्यांनी अनेक वर्ष कारागृहात काढली आहेत. मात्र त्यांच्यासोबत सोडण्यात आलेल्या 26 जणांवर आक्षेप असल्याचेही गिरिराज सिंह यांनी स्पष्टे केले आहे.

भाजपवाल्यांच्या पोटात दुखू लागले :नितीश कुमार यांच्या सुशासनात सामान्य आणि विशेष व्यक्ती असा फरक केला जात नाही, हे भाजपला कळायला हवे. आनंद मोहनने संपूर्ण शिक्षा भोगली आहे. त्यांना कोणत्याही दोषी व्यक्तीला मिळणारी सूट मिळू शकली नाही. नियमात विशेष लोकांसाठी तरतूद करण्यात आली होती. नितीशकुमार यांनी सामान्य आणि विशेष हा फरक संपवला आहे. आता भाजपवाल्यांच्या पोटात का दुखू लागले आहे माहीत नसल्याचे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी सांगितले आहे.

आनंद मोहन यांची सुटका हा तर अन्याय :तत्कालिन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांच्या पत्नी उमा देवी यांनी बिहार सरकारच्या निर्णयावर निषेध व्यक्त केला आहे. नितीश सरकारवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी हा निर्णय चुकीचा आणि अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. उमा देवी यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. नितीश कुमार हत्येच्या दोषीला सोडून देऊन चुकीचा आदर्श ठेवत आहेत. हे पाऊल गुन्हेगारांना सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यास प्रोत्साहित करेल. तुरुंगातून सहज बाहेर पडू शकतात, असा नेत्यांचा समज होईल. काही राजपूत मतांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नितीश कुमार कमी जागा जिंकून सरकार बनवू शकतात, पण नागरिक अशा नेत्यांवर आणि अशा सरकारवर विश्वास ठेवतील का असा सवाल जी कृष्णय्या यांच्या पत्नी उमा देवी यांनी केला आहे.

कशी झाली आनंद मोहनची तुरुंगातून सुटका :बिहारमधील महाआघाडी सरकारने अलीकडेच तुरुंगाचे नियम बदलले आहेत. त्यामुळे आनंद मोहनची सुटका शक्य झाली. तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची वर्तणूक चांगली असल्यास त्यांना सोडण्यात येते. मात्र बिहार सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांच्या खुन्यांना सोडण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु नितीश सरकारने बिहार जेल नियम 2012 च्या नियम 481 (1) ए मध्ये सुधारणा केली. त्यानंतर राज्याच्या गृह विभागाने अधिसूचना जारी केली. त्यामुळे आनंद मोहनची सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा - Prakash Singh Badal: भाजपला राजकीयदृष्ट्या 'अस्पृश्य' बोलले जात असताना प्रकाशसिंग बादलांनी दिली साथ

ABOUT THE AUTHOR

...view details