नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेचा सध्या जोरदारपणे प्रचार सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. यामध्ये विश्व हिंदू परिषदेशी संलग्न संघटना बजरंग दलाची तुलना पीएफआयशी केली असल्याचा वाद सध्या सुरू आहे. तसेच, सत्तेत आल्यास दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन यामध्ये दिले आहे. मात्र, काँग्रेसच्या या आश्वासन आणि जाहीरनाम्यावरुन देशात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी बजरंग दलाची पीएफआयशी तुलना केल्याचा आरोप केला आहे. तसेच, आरोप केला की काँग्रेस आणि पीएफआयची युती आहे. काँग्रेसने संसदेत सिमीसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्यास विरोध केला होता अशी आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली आहे.
बजरंग दल शक्य तितक्या लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर देईल : सोनिया गांधी चुकीच्या मार्गाने बजरंग दलाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून ते म्हणाले की, आम्ही हे सहन करणार नाही. बजरंग दल शक्य तितक्या लोकशाही मार्गाने प्रत्युत्तर देईल. सुरेंद्र जैन म्हणाले की, काँग्रेस पक्षाने कर्नाटक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना ज्या पद्धतीने प्रखर देशभक्तीवादी संघटना बजरंग दलाची तुलना कुप्रसिद्ध, देशद्रोही, दहशतवादी आणि प्रतिबंधित संघटना पीएफआयशी केली आहे, ती दुर्दैवी आहे असही ते यावेळी म्हणाले आहेत.