महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नातीचा विनयभंगप्रकरणी उत्तराखंडच्या माजी मंत्र्याची आत्महत्या, सुनेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. त्यांनी पाण्याच्या टाकीवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी बहुगुणा यांनी पोलिसांना बोलावले होते, नंतर पाण्याच्या टाकीवर चढून पिस्तुलाने आत्महत्या केली.

नातीचा विनयभंगप्रकरणी उत्तराखंडच्या माजी मंत्र्याची आत्महत्या
नातीचा विनयभंगप्रकरणी उत्तराखंडच्या माजी मंत्र्याची आत्महत्या

By

Published : May 28, 2022, 8:31 AM IST

डेहराडून (उत्तराखंड):उत्तराखंडचे माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी पाण्याच्या टाकीवर गोळी झाडून आत्महत्या केली.
भूपिंदर सिंग धोनी, मंडळ अधिकारी (सीओ) हल्द्वानी यांनी माहिती दिली की बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर त्यांच्या नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. "शेजारी असलेल्या सविताच्या तक्रारीवरून त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याने तिच्या सासूसोबत फिरत असताना तिच्यावर अत्याचार, धमकावणे आणि हल्ला केल्याचा आरोप केला होता," धोनी यानी हीे माहिती दिली.

आत्महत्येपूर्वी बहुगुणा यांनी पोलिसांना बोलावले होते, नंतर पाण्याच्या टाकीवर चढून पिस्तुलाने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांनी सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बराच वेळ संवाद साधल्यानंतर त्यांना खाली उतरण्यास सांगितले. पण नंतर त्यांनीे अचानक बंदूक काढून स्वतःच्या छातीत गोळी झाडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. असे धोनी पुढे म्हणाले.

आत्महत्येचे कारण विचारले असता ते म्हणाले की कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, "परंतु प्रकरण आणि आरोपांमुळे ते नाराज होते." उत्तराखंड रोडवेजचे कर्मचारी असलेल्या बहुगुणा यांना 2002 मध्ये राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details