अलीगढ (उत्तर प्रदेश) -रोरावार पोलीस स्टेशन हद्दीतील मथुरा बायपास येथे असलेल्या अल दुआ मीट फॅक्टरीमध्ये अचानक अमोनिया गॅसची गळती सुरू झाल्याने खळबळ उडाली. अमोनिया गॅसची गळती झाल्याने कारखान्यात चेंगराचेंगरी झाली. जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात गॅसच्या झटक्याने आलेल्या सुमारे ४५ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. इतर मजुरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Aligarh Ammonia Gas Leak: अलीगड मीट फॅक्टरीत गॅस गळती, 50 जणांची प्रकृती गंभीर
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील अल दुआ मीट फॅक्टरीत अमोनिया वायूची गळती झाल्याने अनेक कामगार बेशुद्ध झाले. या कर्मचाऱ्यांमध्ये मुली, महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. वायु गळतीमुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना जवाहरलाल नेहरू मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बेशुद्ध कर्मचाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश मिळवले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा अधिकारी इंदर विक्रम सिंह यांच्यासह एसएसपी कलानिधी नैथानीही घटनास्थळी पोहोचले. माहिती देताना जिल्हा दंडाधिकारी इंदर विक्रम सिंह यांनी सांगितले की, अल दुआ मीट फॅक्टरीमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली होती, त्यामुळे अनेक लोक बेहोश झाले आहेत. सुमारे 47 जणांना जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व डॉक्टरांना उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमागचे कारण काय, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल सिंह म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे अलीगड हे मांस कारखान्यांचे केंद्र आहे. येथे 10 हून अधिक मांस कारखाने आहेत. जे परदेशात मांस निर्यात करतात. येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात. याआधीही येथे गॅस गळतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अल्लाना मीट फॅक्टरीला भीषण आग लागली होती. विशेष म्हणजे या मांस कारखान्यांच्या आजूबाजूला निवासी परिसरही आहे. मात्र, घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.