वॉशिंग्टन डी. सी - पुन्हा एकदा भारताचा आंतराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांना अमेरिकने 'अँटी करप्शन चॅम्पियन्स अवार्ड' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्यासह हा पुरस्कार जगातील 12 जणांना देण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. भष्ट्राचाराविरोधात लढा देणाऱ्या शूरवीरांच्या समर्पणाचे मी कौतूक करतो, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्याला आणि जगात त्यांच्याप्रमाणेच भष्ट्राचाराविरोधात लढा देणाऱ्या अनेकांना प्रेरित केले आहे, असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या अंजली भारद्वाज यांना अमेरिकेचा 'अँटी करप्शन चॅम्पियन्स अवार्ड'
भारतीय सामाजिक कार्यकर्त्या अंजली भारद्वाज यांना अमेरिकने 'अँटी करप्शन चॅम्पियन्स अवार्ड' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.
भष्ट्राचाराविरोधात लढा देणाऱ्या जगातील लोकांसोबत मिळून काम केल्यास आपल्या भष्ट्राचाराविरोधातील लढाईला यश मिळेल, असे बायडेन प्रशासनाने आधोरेखीत केले. तर भारद्वाज यांनी टि्वट करून, सत्ताधिकाऱ्यांना जबाबदार बनवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या सामुहिक प्रयत्नांना हा पुरस्कार मान्यता प्रदान करतो, असे म्हटलं. भारद्वाज यांनी दिल्ली विद्यापीठाअंतर्गत असलेल्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून एमएससीचे शिक्षण घेतले. तर दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली.
राज्य विभागाच्या माहितीनुसार, भारद्वाज या गेल्या दोन दशकापासून भारतातील माहिती अधिकार चळवळीच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. तसेच सतर्क नागरिक संघटनाच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. सरकारमधील पारदर्शकता, उत्तरदायित्व वाढविण्यासाठी आणि नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे संघटन कार्यरत आहे. तसेच त्या राष्ट्रीय पिपल फॉर पीपल्स राइट टू इन्फॉर्मेशन (एनसीपीआरआई) संयोजक आहेत.