लखनौ -स्थानिक निवडणुकीत नामनिर्देशित अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याशी एका व्यक्तीने गैरवर्तवणूक केली. ही घटना लखीमपूर खेरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक भागातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्कल अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.
महिलेशी गैरवर्तवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अपक्ष आमदाराचा समर्थक असल्याचे बोलले जात आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा-दिलासादायक! टीसीएस ४० हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून देणार नोकऱ्या
कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश-
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही स्थितीत वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पोलिसांनी अधिक दक्ष व संवदेनशील राहण्याची सूचना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी दिली आहे.