महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Russia attacks Vinnytsia : युक्रेनच्या विनितसिया शहरावर रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला

युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री (Minister of Foreign Affairs of Ukraine) दिमित्रो कुलेबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनचे मोठे शहर असलेल्या विनितसिया (Ukraine's Vinnytsia city) वर रशियन क्रूझ क्षेपणांस्त्रांनी हल्ला (attacked by Russian cruise missiles) चढवला आहे.

By

Published : Mar 6, 2022, 10:29 PM IST

कीव: युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री (Minister of Foreign Affairs of Ukraine) दिमित्रो कुलेबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांनी (attacked by Russian cruise missiles) रविवारी विनितसियावर हल्ला केला आहे. हे शहर दूर अंतरावर आहे.कुलेबा यांनी ट्विटरवर सांगितले की, आठ रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांनी विनितसियात हल्ला झाला आहे. त्यांनी पुतीनच्या या कृतीला 'भ्याड' म्हटले आहे. तसेच युक्रेनवर नो-फ्लाय झोन लादण्यासाठी परदेशी देशांकडून मदत मागितली आहे. त्यांनी 'रशियन दहशतवाद' रोखण्यासाठी हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण, लढाऊ विमानांचीही मागणी केली आहे.

युक्रेन संसदेच्या अधिकृत ट्विटर हँडलने देखील ट्विट केले आहे की, विनित्सियात क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. ज्यामध्ये शहराचे विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेनवरील नो-फ्लाय झोन करण्याची आणि देशाला विमाने देण्याची विनंती जगाला केली आहे. दरम्यान, एका आठवड्यापासून वेढलेल्या दक्षिणेकडील शहर मारियुपोलमधून नागरिकांना बाहेर काढण्याच्या युक्रेनच्या प्रयत्नात सतत रशियन गोळीबार आडवा येत आहे. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की मार्युपोल बंदर शहरातून स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत स्थानिक युद्धविराम सुरू होणार होता.

गृह मंत्रालयाचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी टेलिग्रामवर सांगितले की, कोणताही 'ग्रीन कॉरिडॉर' असू शकत नाही. कारण गोळीबार केव्हा आणि कोणावर सुरू करायचा हे फक्त रशियन लोकांचा आजारी मेंदू ठरवतो. मारियुपोल आणि जवळच्या व्होल्नोवाखा शहरासाठी नियोजित युद्धविराम असतानाही तेथे हल्ले झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details