महाराष्ट्र

maharashtra

Gold Rates Today : सोन्याच्या किमतीत वाढ.. चांदीचे दर घसरले.. पहा आजचे देशभरातील बाजारभाव

By

Published : Jul 3, 2022, 7:55 AM IST

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र कालपासून सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात घट पाहावयास मिळाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आज रविवारी (दि. ३ जुलै) १५० रुपयांनी वाढला आहे. आज मुंबईत सोन्याच्या दरात ५२२४० रुपये इतका आहे.

Gold Rates Today
आजचे सोने चांदीचे दर

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४८००० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२२४० रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५७८ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये आज जोरदार वाढ पाहावयास मिळत आहे. सोने १५० रुपयांनी महाग झाले आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२२८० रुपये
  • दिल्ली - ५२४०० रुपये
  • हैदराबाद - ५२३४० रुपये
  • कोलकत्ता - ५२३४० रुपये
  • लखनऊ - ५२४९० रुपये
  • मुंबई - ५२२०० रुपये
  • नागपूर - ५२३९० रुपये
  • पुणे - ५२३९० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६३५०० रुपये
  • दिल्ली - ५७८०० रुपये
  • हैदराबाद - ६३५०० रुपये
  • कोलकत्ता - ५७८०० रुपये
  • लखनऊ - ५७८०० रुपये
  • मुंबई - ५७८०० रुपये
  • नागपूर - ५७८०० रुपये
  • पुणे - ५७८०० रुपये


सोन्याचे दर वाढणार :परदेशातून सोने आयात करणे आता महाग झाले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण 12.50 टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर 2.50 टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेवलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा :Todays Petrol Rate : औरंगाबादेत पेट्रोल- डिझेलच्या किमतीचा भडका.. ठाण्यातही झाली वाढ.. पहा राज्यभरातील आजचे दर

For All Latest Updates

TAGGED:

gold rate

ABOUT THE AUTHOR

...view details