मेष: चंद्र आज 29 ऑक्टोबर 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.
वृषभ : चंद्र आज 29 ऑक्टोबर 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.
मिथुन :चंद्र आज 29 ऑक्टोबर 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रां कडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी व संतती ह्यांच्याशी सुसंवाद राहिल्याने दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.
कर्क : चंद्र आज 29 ऑक्टोबर 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख - शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे व व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.
सिंह :चंद्र आज 29 ऑक्टोबर 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज स्वभावात उग्रता व संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी - व्यवसायात अडचणी आल्याने नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल.
कन्या :चंद्र आज 29 ऑक्टोबर 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. आग व पाणी या पासून जपून राहावे. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती ह्यामुळे संकट ओढवेल.