थेनी - जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या अमेरिकेतील राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांनी विजय मिळवला. जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून तर कमला हॅरिस या उपराष्ट्रध्यक्ष पदासाठी 20 जानेवरीला शपथ घेणार आहेत. फळांवर प्रतिमा कोरणारे तामिळनाडूतील प्रसिद्ध शिल्पकार एम. एलंचेजियन यांनी जो बायडेन आणि कमला हॅरिस यांची प्रतिमा टरबूजावर कोरली आहे.
बायडेन यांच्या शपथ सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये, तसेच संसदेवरील हिंसाचारासारखी घटना घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. अमेरिकेतील 50 राज्यातील सरकारी कार्यालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राजधानी वॉशिंग्टन डी. सी मध्ये शस्त्रसज्ज 20 हजार जवान तैनात करण्यात येत आहेत. मागील आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी संसेदत धुडगूस घातला होता. त्यामुळे जास्त खबरदारी बाळगली जात आहे.