नवी दिल्ली -देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या 14 महिन्यांत 21 देशांतील 15 लाखापेक्षा अधिक मुलांनी आपल्या पालकांना गमावले आहे. यात भारताचा आकडा 1,19,000 आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अॅब्युज (एनआयडीए) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) च्या अभ्यासानुसार, भारतातील 25,500 मुलांनी आपल्या आईला गमावले आहे. तर 90,751 मुलांना आपल्या वडिलांना गमावलं आहे.
जगभरातील 11 लाख 34 हजार मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना गमावलं आहे. यातील 10 लाख 42 हजार मुलांनी आई-वडिल किंवा दोघांना गमावलं आहे. जास्त मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला गमावलं आहे. तर एकूण 15 लाख 62 हजार मुलांनी पालकांना गमावलं आहे.
दक्षिण अफ्रीका, पेरू, अमेरिका, भारत, ब्राझिल और मॅक्सिको देशातील मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला गमावलं आहे. लहान वयात आई-वडिलांना गमावल्यानंतर मुलांवर मानसिक तणाव असतो. आशावेळी मुलांची काळजी घेतली पाहिजे, असे एनआयडीएचे संचालक नोरा डी वोल्कोव्ह यांनी सांगितले.
अहवालानुसार 2,898 भारतीय मुलांनी त्यांचे पालक आजी-आजोबापैकी एकाला गमावले. तर 9 मुलांनी दोघांना गमावले आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे लिंग आणि वयाच्या आभ्यासातून आढळले, की दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त इतर देशांमध्ये महिलांपेक्षा विशेषत: मध्यमवयीन आणि वृद्ध पुरुष जास्त मरण पावले आहेत.