महाराष्ट्र

maharashtra

केरळमध्ये मोठी घडामोड : वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी या जेष्ठ नेत्याला अटक

केरळ जनपक्षम सेक्युलर पक्षाचे ज्येष्ठ नेते पी.सी. जॉर्ज यांना रविवारी पोलिसांनी ताब्यात ( P C George arrested for hate speech ) घेतले. तिरुअनंतपुरम येथील अधिवेशनात केलेल्या भाषणातून धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन दिल्याबद्दल केरळ पोलिसांनी शनिवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

By

Published : May 1, 2022, 3:01 PM IST

Published : May 1, 2022, 3:01 PM IST

PC George
पी.सी. जॉर्ज

तिरुअनंतपुरम ( केरळ ) : केरळ जनपक्षम सेक्युलर पक्षाचे ज्येष्ठ राजकारणी पी.सी. जॉर्ज यांना मुस्लिमांविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, तिरुअनंतपुरममधील फोर्ट पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी रविवारी पहाटे जॉर्ज यांना कोट्टायम जिल्ह्यातील एरट्टुपेट्टा येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तिरुअनंतपुरम येथील अधिवेशनात केलेल्या भाषणातून धार्मिक द्वेषाला प्रोत्साहन दिल्याबद्दल केरळ पोलिसांनी शनिवारी जॉर्जविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

राज्याचे पोलिस प्रमुख अनिल कांत यांच्या सूचनेनुसार, फोर्ट पोलिस स्टेशनने या माजी आमदारावर स्वतःहून कारवाई केली. ते म्हणाले की, जॉर्ज विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 153A (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला तिरुअनंतपुरम येथे आणले जात आहे. केरळचे माजी काँग्रेस नेते जॉर्ज यांनी राज्यातील बिगर मुस्लिमांना मुस्लिम समुदायाद्वारे चालवल्या जाणार्‍या रेस्टॉरंट्सपासून दूर राहण्यास सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे.

शुक्रवारी अनंतपुरी हिंदू महासंमेलनात संबोधित करताना जॉर्ज यांनी मुस्लिम समाजावर आरोप केला होता. मुस्लिम चालवल्या जाणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये नपुंसकत्व निर्माण करणाऱ्या औषधाचा थेंब चहामध्ये टाकून विकला जात आहे. केरळ विधानसभेत 33 वर्षे पुंजार जागेचे प्रतिनिधित्व करणारे 70 वर्षीय जॉर्ज यांनी गैर-मुस्लिमांना मुस्लिमांकडून चालवल्या जाणार्‍या व्यवसायांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. जॉर्ज यांच्या वक्तव्याचा राज्यातील सत्ताधारी सीपीआय(एम) आणि विरोधी काँग्रेसने निषेध केला.

(पीटीआय-भाषा)

हेही वाचा : VIDEO : हत्तींच्या कळपासोबत सेल्फी घ्यायचा असेल, तर केरळमधील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

ABOUT THE AUTHOR

...view details