सतना : माणुसकीला लाजवेल (Humanity Shamed) अशी घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात समोर आली आहे, जिथे एका महिलेने चोरीची तक्रार केली म्हणुन चिडलेल्या चोराने जेलमधून बाहेर येताच त्या महिलेला बेदम मारहाण केली, त्यानंतर तिने तिची साडी काढून संपूर्ण गावात फिरले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.( Talibani Punishment)
असे आहे प्रकरण: सतना येथे पूर्वी काही लोक चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसले होते, त्यावेळी घरात झोपलेले पती पत्नी जागे झाले हे पाहुन तिन, चार चोरटे पळून गेले, पण एका चोराला जोडप्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर चोर ऋषिराजला पोलिसांनी तुरुंगात पाठवले. नुकतीच त्याची तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर आरोपीने महिलेच्या घरी पोहोचून मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर आरोपीने महिलेची साडी काढून तिला संपूर्ण गावात फिरवले. (woman beaten up and half naked)