नवी दिल्ली - पश्चिमेकडील अस्थिरतेच्या परिणामामुळे राजधानी दिल्लीत तापमान घसरण्यास सुरवात होईल आणि पारा 3 ते 4 अंशांपर्यंत कमी होण्याचीही शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
सोमवारी पहाटे रविवारपेक्षा तापमान किंचित जास्त होते. सोमवारी किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर, रविवारी सकाळी ते 11.4 अंश होते. दिवाळीनंतर कमाल तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले, अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयएएनएसला दिली.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 10 जणांना वाचवले, 'या' जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा