गोवा -भाजप सरकारविरोधात गोव्यातील राजभवन (Goa Rajbhavan) समोर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन (Congress Agitation) करण्यात आले होते. या आंदोलनात काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार (Congress leader Kanhaiya Kumar) सहभागी झाले होते. आंदोलक राजभवनात जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवून माघारी पाठवले. यावेळी बोलताना कन्हैया कुमार पोलिसांना म्हणाले की, 'तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी दिल्लीला जिवंत परत जातोय'. सध्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.
- तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा मी परत सुखरूप गेलो- कन्हैया कुमार
पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवल्यानंतर कन्हैया कुमार यांनी पोलिसांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले, जर तुम्ही आम्हाला आज अडवले पण भाजपमुळे तुमच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, त्यांनी तुमची पेन्शन बंद केली, जर भाजप सत्तेत राहिली तर तुमच्यासह सगळ्यांचे भवितव्य धोक्यात येईल. तसेच ते पोलिसांना म्हणाले की, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी दिल्लीला जिवंत परत जातोय.
- काँग्रेसचा राजभवनवर मोर्चा -
भाजप सरकारविरोधात जनतेत असणाऱ्या विविध असंतोषाच्या मागण्यांवर कारवाई व्हावी यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई यांची भेट घेण्याचे ठरवले होते. मात्र काँग्रेसने या भेटीला विरोध मोर्चा केल्याने पोलिसांनी हा मोर्चा राजभवनच्या अगोदरच अडवला. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी भाषणबाजी व भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
- राज्यपालांनी भेट नाकारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक -