महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

KCR Meet Uddhav Thackeray : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट... मुख्यमत्री म्हणाले- देशात सुडाचं राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे स्वागत केले.

By

Published : Feb 20, 2022, 3:02 PM IST

Updated : Feb 20, 2022, 8:46 PM IST

17:03 February 20

देशातील संरचनात्मक आणि धोरणात्मक बदलावर चर्चा - केसीआर

आम्ही देशात संरचनात्मक आणि धोरणात्मक बदलावर सविस्तर चर्चा केली. तसेच वेगवान विकासावरही आमच्याच चर्चा झाल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पत्रकार परिषदेत म्हणाले.

16:59 February 20

चांगली दिशा आम्ही आज ठरवली आहे : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर

उद्धव ठाकरे
आपल्याला कल्पना आहे भेटीबाबत अनेक दिवस चर्चा होती आज भेटीचा योग आला
काल शिवजयंती होती आणि दुसर्या दिवशी भेट
आम्ही चर्चेत काही लपवण्यासाठी ठेवलं नाही
देशात सुडाचे राजकारण सुरू आहे
आमचं हिंदुत्व अस नाही
असाच सुरू राहील तर देशाचे काय होईल
संपूर्ण देशात राज्य आपली शेजारी धर्म विसरली आहेत
आम्ही सख्खे शेजारी आहोत
एका नव्या विचारांची आज सुरवात झाली आहे
जे देशाचे मूलभूत प्रश्न न सोडता इतर मुद्द्यांवर बोलले जातेय
चांगली दिशा आम्ही आज ठरवली आहे

राज्य गेले खड्यात देश गेला खड्यात असे राजकारण सुरू आहे

16:55 February 20

आता ही सुरुवात आहे पुढे आम्ही सर्वच जणांशी बोलणार आहोत : के चंद्रशेखर राव

के चंद्रशेखर राव-
देशाची 75 वर्षाची विकास गती आणि राजकारण यावर चर्चा झाली
उद्धवजी यांच्याशी लांब चर्चा झाली. अनेक मुद्द्यावर एकमत झाले.
देशाची उन्नती झाली पाहिजे आणि पॉलिसी बदल करावी यासाठी चर्चा झाली.
पुढे मिळून काम करणार.
काही दिवसात पुन्हा आम्ही भेटणार आहोत.
एक रस्ता ठरवला जाणार.
आम्ही दोघे भाऊ आहोत.
महाराष्ट्र सरकार आणि आम्ही मिळून प्रोजेक्ट बनवले.
1 हजार किलोमीटर ची आपल्या राज्याची बॉर्डर आहे.
मिळून आम्ही पुढे काम करणार.
सध्या देशात सुरू आहे त्यात बदल गरज आहे.
देशाचे माहोल खराब झाला नाही पाहिजे मिळून जुळून देश बनवावा लागेल.
महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो पूर्ण होतो.
शिवाजी महाराज आणि बाळासाहेब यांचा महाराष्ट्र आहे.
आमच्या दोघात झाली चर्चा चे परिणाम चांगले निघतील.
मी त्यांना तेलंगणात आमंत्रित करत आहे.
आता ही सुरुवात आहे पुढे आम्ही सर्वच जणांशी बोलणार आहोत.

16:54 February 20

संजय राऊत : पुढची काय दिशा असेल, काय रणनीती असेल याबाबत दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाली

संजय राऊत : पुढची काय दिशा असेल, काय रणनीती असेल याबाबत दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाली

16:34 February 20

देशात बदल झाला पाहिजे. देशात परिवर्तनाची गरज आहे : के. चंद्रशेखर राव

देशाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आलो. उद्धवजींना भेटून प्रसन्न वाटलं. अनेक मुद्द्यांवर आमची सहमती झाली. देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आमची चर्चा झाली. सर्व विषयांवर आम्ही एकजूट झालो आहोत. पुढे एकत्र काम करण्याचं आम्ही ठरवलं. देशात अनेक जण आमच्यासोबत आहेत. काही दिवसात हैदराबाद किंवा अन्य ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आम्ही मोठा प्रोजेक्त केला. त्याचा आम्हाला फायदा झाला आहे. देशात बदल झाला पाहिजे. देशात परिवर्तनाची गरज आहे.

16:31 February 20

आज एक सुरुवात झाली आहे. देशातील अन्य नेत्यांशी आम्ही चर्चा करणार : के. चंद्रशेखर राव

आज एक सुरुवात झाली आहे. देशातील अन्य नेत्यांशी आम्ही चर्चा करणार : के. चंद्रशेखर राव

16:28 February 20

सुडाचं राजकारण करणं ही आमची भूमिका नाही, आमचं हिंदुत्व असं नाही : उद्धव ठाकरे

सुडाचं राजकारण करणं ही आमची भूमिका नाही, आमचं हिंदुत्व असं नाही : उद्धव ठाकरे

16:25 February 20

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय : के. चंद्रशेखर राव

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय : के. चंद्रशेखर राव

16:25 February 20

चांगली सुरुवात करण्यासाठी आम्ही एकत्र येतोय : उद्धव ठाकरे

चांगली सुरुवात करण्यासाठी आम्ही एकत्र येतोय : उद्धव ठाकरे

16:21 February 20

देशात चाललेल्या सूडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा : उद्धव ठाकरे

देशात चाललेल्या सूडाच्या राजकारणाविरोधात आमचा लढा : उद्धव ठाकरे

16:21 February 20

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीचा परिणाम लवकरच दिसेल : के. चंद्रशेखर राव

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीचा परिणाम लवकरच दिसेल : के. चंद्रशेखर राव

16:20 February 20

देशातील राजकीय परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे : के चंद्रशेखर राव

देशातील राजकीय परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे : के चंद्रशेखर राव

16:19 February 20

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना तेलंगणा भेटीचं निमंत्रण

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंना तेलंगणा भेटीचं निमंत्रण

15:54 February 20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे स्वागत केले.

15:54 February 20

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भेटवस्तू देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सत्कार केला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भेटवस्तू देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सत्कार केला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भेटवस्तू देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सत्कार केला.

15:53 February 20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह एकत्र फोटो काढण्यात आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह एकत्र फोटो काढण्यात आला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह एकत्र फोटो काढण्यात आला

15:21 February 20

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या शिष्टमंडळाचे वर्षा बंगल्यावर केले स्वागत

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या शिष्टमंडळाचे वर्षा बंगल्यावर केले स्वागत

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. त्यांच्यासोबत तेलंगणामधील अनेक नेतेही उपस्थित आहेत. या सर्वांचे स्वागत वर्षा बंगल्यावर करण्यात आले. यावेळी तेलंगणातील नेत्यांसह खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

15:08 February 20

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यात 'चाय पे चर्चा'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यात 'चाय पे चर्चा'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि ठाकरे यांच्यामध्ये 'चाय पे चर्चा' झाली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्ष निवासस्थानी दोघांनी चहा घेत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत हे उपस्थित होते.

15:04 February 20

उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीदरम्यान तेजस ठाकरेंच्या उपस्थितीने सर्वांना आश्चर्य

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल

उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या उपस्थितीने सर्व चर्चेचा विषय झाला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान तेजस ठाकरे राजकारणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना त्यांची उपस्थिती महत्वाची मानली जात आहे.

14:48 February 20

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबईत दाखल

मुंबई :तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे मुंबईमधील मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले असून, देशातील विरोधी पक्षांच्या आघाडी संदर्भात ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मोदी - भाजपच्या विरोधात एकत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे हा विचार तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी मांडला आहे. यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रात शिवसेना कार्यप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्या त्या राज्यातील सक्षम असलेल्या प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन एकसंघ लढा दिल्यास भाजपाचा पाडाव होऊ शकतो, अशी धारणा केसीआर यांची झाली आहे. म्हणूनच त्यांनी आता विरोधकांची मजबूत आघाडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच दृष्टीने त्यांनी आज वर्षा या निवासस्थानी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. या भेटीनंतर केसीआर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांनी यापूर्वी दोन वेळा थर्ड फ्रंट करण्याचा प्रयत्न देशातील विविध पक्षांच्या नेत्यांसोबत बसून केला होता. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे केसीआर आणि शरद पवार यांची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जाते आहे.

Last Updated : Feb 20, 2022, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details