महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Jawan Beaten : ट्रेनमध्ये नमाज पढण्यावरून वाद, कोल्हापूरच्या नौसेना जवानाला मध्य प्रदेशात मारहाण

'स्वर्ण जयंती एक्स्प्रेस'मधून विशाखापट्टणमला जाणाऱ्या लष्कराच्या जवाना सोबत रेल्वेतील पॅंट्री कारच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. (Swarna Jayanti Express train controversy). ही घटना इटारसी आणि बैतुल दरम्यानची असल्याची माहिती आहे. (pantry employees beaten naval jawan).

Jawan Beaten In Train
Jawan Beaten In Train

By

Published : Nov 21, 2022, 10:23 PM IST

बैतुल (मध्य प्रदेश) - हजरत निजामुद्दीन येथून धावणारी १२८०४ 'स्वर्ण जयंती एक्स्प्रेस' इटारसी आणि बैतुल दरम्यान पोहोचली तेव्हा रेल्वेच्या पॅंट्री कारचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांनी नौदल डॉकयार्डच्या डीएससी प्लाटूनमध्ये तैनात असलेले सैनिक विलास नायक यांच्यावर हल्ला केला. (Swarna Jayanti Express train controversy). ही घटना समजताच जखमी जवानाला जीआरपी पोलिसांनी बैतुल स्थानकात उतरवून वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. तेथे जवानावर उपचार सुरू आहेत. सध्या या प्रकरणी जीआरपी पोलिस आणि रेल्वे व्यवस्थापनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (pantry employees beaten naval jawan).

नौसेना जवानाला मारहाण

मार्गात नमाज पढण्यावरून वाद - घटनेबाबत जवान सांगतो, "मी ज्या डब्यात प्रवास करत होतो, त्या डब्यात काही मुस्लिम बांधवही प्रवास करत होते. मी त्यांना बाथरूममध्ये जाण्यास रस्ता मागितला असता त्यांनी तो दिला नाही. हा प्रकार दोनदा घडला. तिसर्‍यांदा संध्याकाळीही त्यांनी मला जाऊ दिले नाही आणि रस्ता अडवला. मी त्यांना सांगितले, सर्व काही चुकीचे आहे. तुम्ही जर वाटेत थांबून नमाज पढलात तर मी देखील मंत्रोच्चारही करेन. असे म्हणत मी वाटेत बसून मंत्रोच्चार करू लागलो. तेव्हा पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्याने मला मार्गातून हटण्यास सांगितले. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मुस्लिम बांधव रस्ता अडवून नमाज अदा करत होते, तेव्हा तुम्ही त्यांना हटवले नाही. आणि तुम्ही मला काढून टाकता. माझा आणि त्यांचा काही काळ वाद झाला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना आणि काही साथीदारांना सोबत घेऊन वाद सुरू केला. नंतर तीन जणांनी माझ्याशी हाणामारी केली. त्यांनी बोगीत बसलेल्या सर्व लोकांना जोरदार मारहाण केली. सर्व लोकं ही घटना पाहत होते मात्र कोणी हस्तक्षेप केला नाही."

अद्याप कारवाई नाही - माजी सैनिक संघटनेला या प्रकरणाची माहिती मिळताच माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी जिल्हा रूग्णालय गाठून शिपायाची भेट घेतली व त्यांच्या पत्नी व मुलाला रेल्वे स्थानकावरून हलविले. सध्या जीआरपी पोलिसांनी किंवा रेल्वे व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही किंवा याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.

जवान हरिद्वारहून परतत होता -जवानाने सांगितले की तो मूळचा महाराष्ट्रातील दोनीवाडी कोल्हापूरचा आहे आणि सध्या तो विशाखापट्टणमच्या नेव्हल डॉकयार्डच्या डीएससी प्लाटूनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. हा जवान हरिद्वार येथील रामदेव बाबांच्या आश्रमात उपचारासाठी गेला होता, तेथून परतत असताना ही घटना घडली. तो निजामुद्दीन स्थानकातून 12804 'स्वर्ण जयंती एक्स्प्रेस'च्या स्लीपर क्लास एस4 कोचमधून प्रवास करत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details