महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Suvendu Adhikari: पश्चिम बंगाल पोलिसांनी राजबंशी समाजातील तरुणाची हत्या केल्याचा सुवेंदू अधिकारी यांचा आरोप

शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल पोलिसांनी कालियागंजमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी ट्विट करून सीएम ममता बॅनर्जी यांच्याकडे या हत्येची जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे.

By

Published : Apr 27, 2023, 7:30 PM IST

Suvendu Adhikari
Suvendu Adhikari

कोलकाता/कालियागंज : विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंजमध्ये एका ३३ वर्षीय भाजप कार्यकर्त्याला गोळ्या घालून ठार केले असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे कालियागंजमध्ये मंगळवारी दुपारी पोलीस दल आणि स्थानिक लोकांमध्ये चकमक झाली, ज्याचे नंतर हिंसाचारात रूपांतर झाले. 21 एप्रिल रोजी मृतदेह सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्येविरोधात लोक निदर्शने करत होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिहारमधून आलेले भाजपसमर्थित गुंड मंगळवारी तेथील तणावाला जबाबदार असल्याचा आरोपही केला.

शुभेंदू यांचे ट्विट

रवींद्रनाथ बर्मन यांचा मुलगा मृत्युंजय बर्मन याला गोळ्या झाडल्या : अधिकारी यांनी एका ट्विटद्वारे आरोप केला की भाजप कार्यकर्ता आणि 33 वर्षीय मृत्युंजय बर्मन यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजपचे पंचायत समिती सदस्य बिष्णू बर्मन यांच्या घरावर पोलिसांनी पहाटे अडीच वाजता छापा टाकला. मात्र, ते तेथे सापडले नाहीत, असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, छाप्यादरम्यान पोलिसांनी रवींद्रनाथ बर्मन यांचा मुलगा मृत्युंजय बर्मन याला गोळ्या झाडल्या. त्यांनी ट्विट केले की, 'हा राज्याचा जुलूम आणि दहशत आहे आणि ममता बॅनर्जी सम्राट नीरोप्रमाणे वागत आहेत.' पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी कालियागंजमधील लोकांविरुद्ध युद्ध घोषित केले आणि पोलिसांनी त्याचे पालन केले, असा आरोपही त्यांनी केला. त्यांनी ट्विट देखील केले आहे की, 'या निर्घृण हत्येची जबाबदारी राज्याला घ्यावी लागेल. अशा अंतर्गत हिंसाचार आणि रक्तपाताच्या विरोधात आवाज उठवून जनतेने लोकशाही मार्गाने उठले पाहिजे.

गावकऱ्यांनी पोलिसांच्या काडतुसाचे कवच जप्त केले : रायगंजच्या पोलीस अधीक्षक सना अख्तर यांनी कालियागंजमधील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. गुरुवारी पहाटे पोलिसांनी कालियागंजच्या राधिकापूर ग्रामपंचायतीच्या चांदगाव गावात छापा टाकला. छापेमारीत गावकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली. अनेक गावकऱ्यांना ताब्यातही घेतले. पोलिसांच्या कारवाईला विरोध केल्याने पोलिसांनी मृत्युंजय बर्मन यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. गावकऱ्यांनी पोलिसांच्या काडतुसाचे कवच जप्त केले आहे. मात्र, रायगंज जिल्हा पोलीस अधीक्षक तक्रार स्वीकारण्यास तयार नाहीत. या घटनेनंतर आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने गावात फिरकलेले नाही. परिस्थितीचा सामना करण्यासाठी कालियागंज बीडीओ कार्यालयाचे मुख्य गेट बंद करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी किंगशुक मैती संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अनेक वेळा फोन केल्यानंतर रायगंज जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सना अख्तर यांनी सांगितले की पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. नुसते दावे करून काम होत नाही, एवढेच ते म्हणाले. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतरच खरी घटना कळेल असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा :Indians Returned from Sudan: सुदानमधील गृहयुद्ध पेटले! सुमारे 3700 भारतीयांना बाहेर काढणार

ABOUT THE AUTHOR

...view details