महाराष्ट्र

maharashtra

Phoolbasan Bai Yadav : एकेकाळी गरिबीमुळे ट्रेन खाली देणार होत्या जीव!.. वाचा पद्मश्री फूलबसन बाई यांची प्रेरणादायी स्टोरी

पद्मश्री पुरस्कार विजेत्या फूलबसन बाई यादव (phoolbasan bai yadav) ह्या एक अशा व्यक्ती आहेत ज्यांची कहाणी आज प्रत्येकाला ऐकायची आहे. जेएनयूमध्ये सुरू असलेल्या स्त्री 2020 मध्ये त्या वक्ता म्हणून सहभागी झाल्या होत्या. यादरम्यान त्यांनी ईटीव्ही इंडियाशी खास बातचीत केली. (success story of phoolbasan bai yadav).

By

Published : Nov 27, 2022, 7:12 PM IST

Published : Nov 27, 2022, 7:12 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

नवी दिल्ली : गरिबीत जन्म. घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट की दोनवेळचे धड खायचीही अडचण. लहान वयात लग्न झाले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत काही सुधारणा नाही. शेवटी एके दिवशी तिने मुलांसह ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. परंतु मुलांनी समजवल्यानंतर तिचे मन बदलले. यानंतर तिने प्रदीर्घ संघर्ष केला आणि आज पद्मश्रीने सन्मानित ही महिला इतरांना जीवन जगण्याची प्रेरणा देत आहे! होय, आम्ही बोलतोय छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील फूलबसन बाई यादव यांच्याबद्दल. (phoolbasan bai yadav). बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्या KBC या प्रसिद्ध शोमध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. तसेच त्यांना देशातील विविध राज्यांतील महाविद्यालयांमध्ये वक्ता म्हणूनही बोलावले जाते. आज त्या लाखो महिलांसाठी प्रेरणा आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित फूलबसन बाई यादव ह्या अशा व्यक्ती आहेत ज्यांची कहाणी आज सर्वांनी ऐकण्याची आवश्यकता आहे. (Padmashree Phoolbasan Bai Yadav). जेएनयूमध्ये सुरू असलेल्या स्त्री 2020 मध्ये त्या वक्ता म्हणून सहभागी झाल्या होती. यादरम्यान त्यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. (success story of phoolbasan bai yadav).

फूलबासन बाई यादव

मुलांनी आत्महत्या करण्यापासून रोखले : फुलबसनबाईंचा जन्म छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे आई-वडील हॉटेलमध्ये भांडी धुवायचे. घरची परिस्थिती अशी होती की, एक वेळचे अन्न मिळणेही कठीण होते. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचे लग्न झाले, पण त्यांचा संघर्ष तिथेच संपला नाही. फूलबासन यांनी सांगितले की, जेव्हा त्या आत्महत्या करणार होत्या तेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितले की, आई, मला मरायचे नाही. मुलांच्या या बोलण्याने त्या मनातून हादरल्या. त्यांनी आपला विचार लगेच बदलला. इथून पुढे त्यांनी स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायचं ठरवलं. आता मला समाजासाठी आणि गरीब महिलांसाठी जगायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

महिला बचत गटाची स्थापना : त्यांनी सांगितले की, 2001 मध्ये दोन रुपये आणि दोन मुठ तांदूळ घेऊन त्यांनी 11 महिलांसोबत महिला गटाचे काम सुरू केले. या दरम्यान त्यांना सामाजिक विरोधालाही सामोरे जावे लागले. परंतु प्रत्येक प्रतिकाराला धैर्याने तोंड देत त्यांनी बमलेश्वरी जनहितकारी बचत गटाची स्थापना केली. फुलबसनबाई या माँ बमलेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी सांगितले की त्यांच्या गटात दोन लाखांहून अधिक महिला काम करत आहेत.

मुलींना देत आहेत कराटे प्रशिक्षण : जेएनयूमध्ये सुरू असलेल्या स्त्री 2020 मध्ये त्यांच्या जीवनातील संघर्षाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, त्या त्यांच्यातील धैर्यामुळे आज इथे उभ्या आहेत. त्या म्हणाल्या की, स्त्रीने एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केला तर तिला ती गोष्ट करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. छत्तीसगड मधील विविध जिल्ह्यांत मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. मुली कोणत्याही परिस्थितीला स्वतःहून सामोरे जाऊ शकतील हा त्यांचा यामागचा उद्देश आहे. संपूर्ण राज्यात सध्या सुमारे तीन हजार मुलींना प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये 13 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील महिलांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details