महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमरावतीमध्ये 18 ते 20 सप्टेंबरला 'भाकप'चे राज्य अधिवेशन; पदाधिकाऱ्यांची माहिती

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे राज्य अधिवेशन शहरात १८, १९, २० सप्टेंबरपर्यंत असे तीन दिवस चालणार आहे. (Communist Party of India) अधिवेशनादरम्यान रॅली व जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाकपचे राज्यसचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नेमानी इन या सभागृहात हे अधिवेशन होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Sep 17, 2022, 3:23 PM IST

Updated : Sep 17, 2022, 11:08 PM IST

अमरावती - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशनेच्या अध्यक्षस्थानी राज्यसचिव काँग्रेस तुकाराम भस्मे तर स्वागत अध्यक्ष म्हणून प्रकल्पग्रस्तांचे नेते प्राध्यापक साहेबराव विधले राहतील. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव अतुलकुमार अंजान, आयटकच्या राष्ट्रीय महासचिव अमरजीत कौर, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड भालचंद्र कानगो उपस्थित राहणार आहेत. (convention of Communist Party of India In Amravti) दरम्यान,याराज्यस्तरीय अधिवेशनाला राज्यभरातून जवळपास ४०० प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती विजय रोडगे यांनी दिली आहे.

जिल्ह्याला डाव्या चळवळीचा देदीप्यमान इतिहास -अमरावती शहरात पक्षाचे राज्य अधिवेशन महेश भवन येथे २७ वर्षांपूर्वी झाले होते. 24 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने अमरावती शहराला पुन्हा एकदा हा सन्मान मिळालेला आहे. अमरावती जिल्ह्यातला डाव्या चळवळीचा देदीप्यमान इतिहास आहे. माजी खासदार सुदाम काका देशमुख, माजी आमदार भाई मंगळे, सहकार नेते नानासाहेब मंगळे, स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड सुनील सिंग नहाटा, कॉम्रेड गिरगावकर, प्राध्यापक भागवतकर, कॉम्रेड पंडितराव चौधरी, डॉक्टर भालचंद्र दिवाणजी, कॉम्रेड खंडेराव बापू, देशमुख कॉम्रेड दत्तात्री चौधरी जानराव मंडोदरी प्राध्यापक शिवदास उताणे प्राध्यापक शरद सुरजूसे सुदृश्य आदी तत्कालीन कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी लालबावटा खांद्यावर घेऊन चळवळीला वाहून घेतले होते.

रॅलीचे आयोजन - फॅसिस्ट प्रवृत्तीविरुद पुढील आंदोलनाची दिशा ठरवून देशाच्या सध्याच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीवर अधिवेशनात चर्चा करण्यात येईल. १८ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब द चौक येथून रैलीला प्रारंभ होणार आहे. ही रॅली रेल्वेस्थानक, राजकमल चौक, शाम चौक मालवीय चौक मार्गे, नेमानी इन येथे पोहोचणार आहे. तीचा समारोप शेतमजूर कामगार सभेने होणार आहे. पत्रकार परिषदेला तुकाराम भस्मे, क्रांती देशमुख, अशोक सोनारकर, सुनील मेटकर, जे. एम. कोठारी डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे उपस्थित होते.

कष्टकऱ्यांसाठी हे अधिवेशन महत्वाचे - २७ वर्षापूर्वी अमरावती शहरात पक्षाचे राज्य अधिवेशन महेश भवन येथे झाले होते. २४ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने अमरावती शहराला पुन्हा एकदा हा मान मिळाला आहे. अमरावती जिल्ह्याला डाव्या चळवळीचा दैदिप्यमान इतिहास आहे. आजही जिल्ह्यात कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नावर संघर्षरत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष कष्टकरी वर्गाचा राजकीय पक्ष आहे. कष्टकरी वर्गाच्या राजकारणाला पुढे नेण्याच्या दृष्टीने सदर अधिवेशन महत्वाचे आहे. आज केंद्रातील आरएसएस प्रणित भाजपच्या नेतृत्वातील मोदी सरकार व शिंदे-फडणवीसच्या नेतृत्वातील बंडखोर सेना, भाजपचे सरकार जनविरोधी फॅसिस्ट सरकारे आहे.

सभेपूर्वी इर्विन चौक येथून प्रारंभ - या सर्व फॅसिस्ट प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरवून देशाच्या सध्याच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीवर अधिवेशनात चर्चा करण्यात येईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात किसान सभेचे महासचिव तथा स्वामीनाथन आयोगाचे सदस्य कॉ. अतुलकुमार अंजान, आयटकच्या महासचिव कामगार नेत्या कॉ. अमर जीत कौर, पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. भालचंद्र कांगो उपस्थित राहणार आहेत. १८ सप्टेंबर रोजी भव्य जाहीर सभेने या अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. नेमाणी ईन येथे कॉ. तुकाराम भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. सभेपूर्वी इर्विन चौक येथून प्रारंभ होणारी मिरवणूक शहराच्या मुख्य भागातून सभास्थळी येईल.

मान्यवरांची उपस्थिती - अधिवेशसाठी राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून पक्ष प्रतिनिधी सहभागी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जाहीर सभेचे अध्यक्ष तुकाराम भस्मे तर स्वागताध्यक्ष प्रकल्पग्रस्तांचे नेते प्रा. साहेबराव विधळे राहणार आहेत. ‘भाकप’च्या सर्व कार्यकर्ते, सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेला तुकाराम भस्मे यांच्यासह क्रांती देशमुख, अशोक सोनारकर, सुनील मेटकर, जे. एम. कोठारी, डॉ. ओमप्रकाश कटेमाटे, नीळकंठ ढोके, सागर दर्योधने आदी उपस्थित होते.

Last Updated : Sep 17, 2022, 11:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details