महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 9, 2020, 6:03 AM IST

ETV Bharat / bharat

चिमण्यांसाठी जीवन समर्पित करणारा अवलिया!

महेश यांनी मुंबईत नॅचरल हिस्ट्री सोसायटीत पक्ष्यांवर अभ्यास केला आहे. ते चिमण्यांची घरांना असलेले धोके आणि घटणारी संख्या यावर पीएचडी करत आहेत. चिमण्यांची काळजी घेण्याबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने अनेक रॅलींचे आयोजन केले आहे.

special story of sparrow man veera mahesh
चिमणी

पश्चिम गोदावरी(आंध्र प्रदेश) - वीरा महेश लहान असताना त्यांना घराच्या छतांवर राहणाऱ्या आणि घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांना बघायला फार आवडायचे. आता ते पश्चिम गोदावरीच्या जंगारेड्डी गुडेममध्ये एक खासगी शिक्षक आहेत. वीरा महेश दिवसेंदिवस कमी होणाऱ्या चिमण्यांच्या संख्येमुळे व्यथित आहेत. चिमण्यांना राहण्यासाठी जागा नसल्याने चिमण्यांची संख्या घटत असल्याचे त्यांनी जाणले. यासाठी त्यांनी जंगारेड्डी गुडेमला स्पॅरो टाऊनमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चिमण्यांना राहण्यासाठी लाकडांची लहान-लहान घरटी तयार केली आणि घरोघरी त्याचे वाटप केले.

चिमण्यांसाठी जीवन समर्पित करणारा अवलिया..

महेश स्वतः बनवलेली घरटी घरोघरी वाटताना घराच्या मालकाकडून लिखित स्वरुपात परवानगी घेतात. यासोबतच ते अनेकदा त्या घरी भेट देतात आणि चिमण्यांबाबत आढावा घेतात. त्यांनी आतापर्यंत ४००पेक्षा जास्त घरटी वाटली आहेत. बांधलेल्या लाकडी घरांचे चिमणीने घरट्यात रुपांतर करावे, हाच त्यांचा हेतू आहे आणि त्याचसाठी ते प्रयत्न करतात. पक्षांना प्रजननास उपयुक्त ठरतील, असे बदलही ते घरट्यांमध्ये करतात.

९७ टक्के घरट्यांमध्ये राहतात चिमण्या -

महेश आता मछलीपट्टणममध्ये शिक्षक म्हणून काम करतात. दर आठवड्याच्या अखेरीस ते घरी येतात आणि चिमण्यांची काळजी घेण्यासाठी काम करतात. त्यांनी २००९मध्ये घरी दोन घरटी बांधून हा प्रयोग सुरू केला होता. महेशने बघितले की चिमण्यांची पिल्ले तीन वर्षात मोठी झाली. यानंतर त्यांनी त्यांच्या या उपक्रमाची व्याप्ती वाढवली. महेश यांनी वाटलेल्या घरट्यांपैकी ९७ टक्के घरट्यांमध्ये चिमण्यांनी राहण्यास सुरुवात केली आहे.

नॅचरल हिस्ट्री सोसायटीत अभ्यास -

महेश यांनी मुंबईत नॅचरल हिस्ट्री सोसायटीत पक्ष्यांवर अभ्यास केला आहे. ते चिमण्यांची घरांना असलेले धोके आणि घटणारी संख्या यावर पीएचडी करत आहेत. चिमण्यांची काळजी घेण्याबाबत जागृती करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने अनेक रॅलींचे आयोजन केले आहे. परिसरात आधीच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळणाऱ्या चिमण्यांना बघून स्थानिकदेखील आनंदी आहेत.

वातारणातील बदल आणि मानवाची बदलती जीवनशैली चिमण्याच्या जीवनासाठी आणि राहण्यासाठी धोकादायक झाली आहे. चिमण्यांना आपण आपल्या घरात घरटी बांधू दिली. तर ही प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवले जाऊ शकते, असे महेश यांचे म्हणणे आहे. यासाठी अनुकूल ठिकाण तयार करण्यासाठी महेश यांचे काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details