महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shubh Vivah Muhurat February 2023 : लग्न करण्यासाठी जाणून घ्या 'फेब्रुवारी' महिन्यातील शुभ तारखा, लग्न मुहूर्त पंचांग

नवीन वर्षाची चाहूल लागताच सगळीकडे लगीनघाई सुरु होते. हिंदू विवाहात तारीख निश्चित करताना विवाह मुहूर्त महत्त्वाची भूमिका बजावते. असं मानलं जातं की, अशुभ मुहूर्तावर केलेले विवाह अनेकदा जोडप्यावर नकारात्मक परिणाम करतात. तेव्हा लग्न केवळ शुभ मुहूर्तावर केले जाते. जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यातील विवाहाच्या शुभ तारखा कोणकोणत्या आहेत ते.

By

Published : Feb 5, 2023, 4:31 PM IST

Shubh Vivah Muhurat February 2023
'फेब्रुवारी' महिन्यातील शुभ लग्न तारखा

आपल्या हिंदू धर्मातील चालीरीतींमध्ये शुभ मुहूर्तावर लग्नकार्य करणे, ही परंपरा खूप शुभ मानली जाते. लग्नापूर्वी वधू-वरांच्या कुंडल्या पाहिल्या जातात. त्यानुसार मग शुभ तारीख, वार, तिथी आणि योग बघुन लग्न ठरवले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार एका वर्षात एकूण चार शुभ मुहूर्त असतात. यामध्ये आखा तीज, देवउठणी एकादशी, वसंत पंचमी आणि भादमी नवमी यांचा समावेश होतो. म्हणजेच या चार प्रसंगी मुहूर्त नसला तरी, लग्नासह इत्यादी शुभ कार्य करता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासारख्या शुभ कार्यासाठी शुक्राचा उदय आवश्यक आहे. वर्षे 2023 मध्ये लग्नासाठी किती शुभ मुहूर्त आहेत? तसेच फेब्रुवारी महिन्यात कोणकोणत्या तारखेला लग्न होऊ शकतात, ते जाणून घेऊया.

2023 मध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे :जानेवारी 2023 - १५, १६, १८, १९, २५, २६, २७, ३०, ३१.फेब्रुवारी 2023 - 6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22 23, 28. मार्च 2023 - 1, 5,6, 9,11, 13.मे २०२३ - ६, ८, ९, १०, ११, १५, १६, २०, २१, २२, २७, २९, ३०. जून 2023 - 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27. नोव्हेंबर 2023 - 23, 24, 27, 28, 29. डिसेंबर 2023 - 5, 6, 7 8, 9, 11, 15.

2023 मध्ये लग्नासाठी 64 शुभ मुहूर्त :हिंदी पंचांगानुसार 2023 मध्ये लग्नासाठी एकूण 64 शुभ मुहूर्त आहेत. यामध्ये जानेवारीमध्ये 9, फेब्रुवारीमध्ये 13, मे मध्ये 14, जून मध्ये 11, नोव्हेंबर मध्ये 5 आणि डिसेंबर मध्ये 7 विवाह शुभ मुहूर्त आहेत.

फेब्रुवारी 2023 विवाह मुहूर्त: 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 22, 23 आणि 28 फेब्रुवारी हे लग्नासाठी शुभ दिवस आहेत. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 13 शुभ दिवस उपलब्ध आहेत.

लग्न करण्यास शुभ दिवस किंवा शुभ तिथी - अभिजीत मुहूर्त आणि गोधुली वेला लग्नासाठी सर्वात शुभ मानले जातात. त्यानंतर द्वितीया तिथी, तृतीया तिथी, पंचमी तिथी, सप्तमी तिथी, एकादशी तिथी आणि त्रयोदशी तिथी विवाहासाठी शुभ आहेत. तसेच लग्नाच्या वेळी शुक्र आणि गुरू नक्षत्राचा उदय झाला पाहिजे.

'हे' 3 योग विवाहासाठी शुभ मानले जातात : वर सांगितलेल्या विवाह तिथीत जेव्हा जेव्हा हा योग येईल, तेव्हा तो योग सर्वात शुभ मानावा. हे योग प्रीति योग, सौभाग्य योग आणि हर्षन योग आहेत. वरील तारखेला हा योग नसला तरी या योगात विवाह होऊ शकतो, कारण हा शुभ योग आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details