नवी दिल्ली :श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case ) आरोपी आफताबवर हल्ला करणाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( judicial custody for Aftab attackers in Delhi) सुनावण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी आफताबला एसएफएल कार्यालयाबाहेर आणत असताना त्याच्यावर तलवारीने हल्ला (attempt to attack Aftab with a sword) करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच हल्लेखोरांपैकी दोघांना अटक केली. मंगळवारी सकाळी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रोहिणी एफएसएल कार्यालयाबाहेर हल्ला करण्यासाठी पाच तरुण गुडगावहून आले होते. latest news from Delhi, Delhi Crime
Shraddha Murder Case : आफताबवर हल्ला करणाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
श्रद्धा हत्याकांडातील (Shraddha Murder Case ) आरोपी आफताबला सोमवारी सायंकाळी एसएफएल कार्यालयाबाहेर आणत असताना त्याच्यावर तलवारीने हल्ला (attempt to attack Aftab with a sword) करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच हल्लेखोरांपैकी दोघांना अटक केली. आफताबवर हल्ला करणाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ( judicial custody for Aftab attackers in Delhi) सुनावण्यात आली आहे. latest news from Delhi, Delhi Crime
हल्लेखोर हिंदू सेनेचे असल्याचा दावा :श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याला मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात पॉलीग्राफ चाचणीसाठी एफएसएल कार्यालयात आणण्यात आले. यादरम्यान बीएसएफचे जवानही एफएसएल कार्यालयाबाहेर तैनात असल्याचे दिसून आले. त्याचवेळी, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपी आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला करणाऱ्या आरोपींना मंगळवारी सकाळी कोर्टात हजर करण्यात आला. त्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस व्हॅनवर हल्ला करणारे तरुण गुडगावहून दिल्लीला आले होते. अन्य तीन हल्लेखोरांचाही पोलीस शोध घेत आहेत. हल्लेखोर हिंदू सेनेचे असल्याचा दावा केला जात आहे.
आफताबचे 70 तुकडे करण्याची धमकी : सोमवारी आरोपी आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर हल्ला करणाऱ्या लोकांनी 'असे कोणी केले तर आम्ही त्याला सोडणार नाही' असे म्हटले होते. ज्याप्रमाणे श्रद्धाचे 35 तुकडे केले, त्याचप्रमाणे आफताबचे 70 तुकडे केले जातील, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी सोमवारी 2 हल्लेखोरांना अटक केली असून इतर 3 हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलीस व्हॅनवर हल्ला करताना हल्लेखोर मागचे गेट उघडून आफताबवर हल्ला करण्यासाठी आले होते, मात्र आफताब सुरक्षेत पोलीस व्हॅनमध्येच उपस्थित होता, त्यामुळे त्याचा जीव वाचला.