चेन्नई - एशियन कॉलेज ऑफ जर्नलिस्टच्या विद्यार्थिनीचा विनयभंग ( Sexual Harassment of Journalist Student in Chennai ) केल्याप्रकरणी उबेर ऑटो चालकाला अटक करण्यात आली ( Uber Auto Driver Arrested ). २५ तारखेला पीडिता तिच्या मित्रासोबत ईसीआर येथून रात्रीच्या वेळी शोलिंगनाल्लूर येथील हॉटेलमध्ये गेली होती.
Sexual Harassment : पत्रकार विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपी ऑटो रिक्षा चालकाला अटक
चेन्नई - एशियन कॉलेज ऑफ जर्नलिस्टच्या विद्यार्थिनीचा विनयभंग ( Sexual Harassment of Journalist Student in Chennai ) केल्याप्रकरणी उबेर ऑटो चालकाला अटक करण्यात आली ( Uber Auto Driver Arrested ). २५ तारखेला पीडिता तिच्या मित्रासोबत ईसीआर येथून रात्रीच्या वेळी शोलिंगनाल्लूर येथील हॉटेलमध्ये गेली होती. तिने सांगितले की, ड्रॉपिंग पॉइंटवर ऑटो चालकाने गैरवर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. याबद्दल तिने ट्विट केले आहे आणि ट्रॅव्हल डिटेल्स, ऑटो ड्रायव्हरचा फोटो ग्रेटर चेन्नई पोलिसांना नमूद केला आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर उत्तर देताना चेन्नई पोलिसांनी आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात उबरने पीडितेला सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून घटनेची माहितीही मागितली आहे. आता चेमनचेरी पोलिसांनी सेल्वम (40) याला चेन्नईच्या पलावक्कम भागातून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
तिने सांगितले की,ड्रॉपिंग पॉइंटवर ऑटो चालकाने गैरवर्तन केले आणि तिचा विनयभंग केला. याबद्दल तिने ट्विट केले आहे आणि ट्रॅव्हल डिटेल्स, ऑटो ड्रायव्हरचा फोटो ग्रेटर चेन्नई पोलिसांना नमूद केला आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावर उत्तर देताना चेन्नई पोलिसांनी आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगितले. या प्रकरणाच्या संदर्भात उबरने पीडितेला सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून घटनेची माहितीही मागितली आहे. आता चेमनचेरी पोलिसांनी सेल्वम (40) याला चेन्नईच्या पलावक्कम भागातून अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.