महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Saluting Bravehearts : अणुसंशोधनात मोलाची भूमिका बजावणारे डॉ. अनिल काकोडकर; वाचा, सविस्तर...

भारताचे स्वातंत्र्य आणि विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचेही गौरव करण्यात येत आहे. डॉ. अनिल काकोडकर ( Dr Anil Kakodkar ) हे नाव भारताच्या प्रगतीपथातील एक महत्वाचे बिंदू. काकोडकर यांचा कार्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. ते १९९६ ते २००० च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.

By

Published : Aug 9, 2022, 3:45 PM IST

Updated : Aug 9, 2022, 7:25 PM IST

Dr Anil Kakodkar
Dr Anil Kakodkar

मुंबई -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आगळ्या ( Azadi Ka Amrit Mahotsav ) वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतात जय्यत तयारी सुरु आहे. अशात भारताचे स्वातंत्र्य आणि विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचेही गौरव करण्यात येत आहे. डॉ. अनिल काकोडकर ( Dr Anil Kakodkar ) हे नाव भारताच्या प्रगतीपथातील एक महत्वाचे बिंदू. काकोडकर यांचा कार्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...

कोण आहेत काकोडकर ? : डॉ. अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. ते १९९६ ते २००० च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते. डॉ. काकोडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील बारावनी गावात झाला. त्यांच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले. डॉ. काकोडकर हे मुंबईच्या रूपारेल कॉलेजमध्ये बारावीपर्यंत होते. त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात बनणाऱ्या "ध्रुव रिक्टर"मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते.

डॉ. काकोडकरांनी आत्तापर्यंत भूषविलेले पद :डॉ. काकोडकर ( सन २०११) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई) याचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० या दरम्यान अध्यक्ष होते. ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे. ते न्यूक्लियर्स सप्लाय ग्रुप (एन.एस.जी. ग्रुप) चे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.

'या' पुरस्काराने झाला सन्मान : डॉ. अनिल काकोडकर यांना 1998 मध्ये पद्मश्री, 1999 मध्ये पद्मभूषण, आणि 2009 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारने सन्मानीत करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना इतरही मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा -Indian Independence Day : स्वातंत्र्याची 75 वर्षे; गांधीजींनी म्हटलेले 'हृदयाचे शहर', सोकल कुटुंबाने जपलाय स्वातंत्र्याचा खजिना

Last Updated : Aug 9, 2022, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details