महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

International Yoga Centre: काश्मीरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठे 'आंतरराष्ट्रीय योग केंद्र'; वाचा खास रिपोर्ट

भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र भारत सरकार जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील मंतलाई येथे बांधत आहे. (International Yoga Centre) या केंद्राचे बांधकाम 2017 मध्ये सुरू करण्यात आले होते, जे 36 महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र, कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम झाला होता. दरम्यान, योग केंद्राचे ९८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती उधमपूरच्या उपायुक्तकृतिका ज्योत्सना यांनी दिली आहे.

International Yoga Centre
आंतरराष्ट्रीय योग

By

Published : Dec 12, 2022, 7:35 PM IST

उधमपूर ( जम्मू-काश्मीर) - भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र जम्मू-काश्मीरमध्ये बांधले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील उधमपूरच्या चेनानी तहसीलमधील मंतलाई गावात हे योग केंद्र बांधले जात आहे. मंतलाई हे गाव हिमालयाच्या कुशीत सालच्या जंगलात वसलेले आहे. तवी नदीच्या काठावर वसलेले हे गाव मैदानी आणि डोंगराच्या मध्ये वसलेले आहे.

आंतरराष्ट्रीय योग केंद्र

अर्थव्यवस्थेला चालना मिळणार - उधमपूरच्या उपायुक्त कृतिका ज्योत्सना यांनी सांगितले की, या सर्वात मोठ्या योग केंद्र प्रकल्पाचे बांधकाम जवळपास 98% पूर्ण झाले आहे. या केंद्राच्या निर्मितीमुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे असही त्या म्हणाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय योग केंद्र

केंद्रात स्विमिंग पूल - मंतलाई हे अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण आहे. येथील आंतरराष्ट्रीय योग केंद्रात इतर आवश्यक सुविधांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. योग केंद्राची इमारत एका मोठ्या पिरॅमिडच्या आकारात बांधलेली आहे. आंतरराष्ट्रीय योग केंद्रात स्विमिंग पूल, बिझनेस कन्व्हेन्शन सेंटर, हेलिपॅड, स्पा, कॅफेटेरिया आणि डायनिंग हॉल, कॉटेज-डिझाइन इको लॉज, जिम्नॅशियम ऑडिटोरियम, बॅटरी ऑपरेटेड कार, मेडिटेशन एन्क्लेव्ह अशा अनेक सुविधा आहेत.

आंतरराष्ट्रीय योग केंद्र

शांततापूर्ण वातावरणात योग - 2017 मध्ये मंटलाई येथे बांधण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय योग केंद्राचे बांधकाम सुरू करण्यात आले. जे 36 महिन्यांत पूर्ण होणार होते. मात्र, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमुळे कामावर परिणाम झाला. मंतलाईमध्ये, संपूर्ण देश आणि जगभरातील लोक शांततापूर्ण वातावरणात योग, ध्यान आणि ध्यान करू शकतील.

ABOUT THE AUTHOR

...view details