जलपाईगुडी ( पश्चिम बंगाल ) : भारतातील सर्वात जुन्या वाघांपैकी ( Oldest Tiger In India ) एक असलेल्या राजा या वाघाचा सोमवारी पहाटे उत्तर बंगालमधील बचाव केंद्रात वयाच्या २५ वर्षे आणि १० महिन्यांचा असताना मृत्यू ( Royal Bengal Tiger dies ) झाला. सुंदरबनमध्ये मगरीने चावल्याने जखमी झालेल्या रॉयल बंगाल टायगर राजाचा दुर्दैवी मृत्यू ( Crocodile Attack On Tiger ) झाला. राजाला सुंदरबनमधून जलदापारा वनविभागाच्या दक्षिण खैरबारी येथील रॉयल बंगाल टायगर रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. जिथे त्याने सोमवारी अखेरचा श्वास घेतला.
वाघाच्या मृत्यूने वन कर्मचाऱ्यांमध्ये शोकाचे वातावरण : राजा सुंदरबनमधील मातला नदी ओलांडत असताना त्याच्या डाव्या पायाला मगरीने चावा घेतला. तेव्हापासून वनविभागाने राजाला खैरबारीत आणले. वयाच्या 11 व्या वर्षी राजाला सुंदरबनमधून दक्षिण खैरबारी येथे आणण्यात आले होते. राजा वन कर्मचारी पार्थसारथी सिन्हा यांच्या देखरेखीखाली बरा होत होता. पण वृद्धत्वामुळे तो पूर्णपणे बरे होऊ शकला नाही. वाघाच्या मृत्यूमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.