रुद्रपूर (उत्तराखंड) : उधमसिंह नगर पोलीस आणि एसओजी टीमने 22 लाखांहून अधिक किमतीच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक केली आहे. बनावट नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी बिजनौरहून काशीपूर येथे आले होते. पोलिसांनी आरोपींकडून बनावट नोटा छापण्याचे साहित्यही जप्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसएसपींनी एक समिती स्थापन केली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करण्याची तयारी केली आहे.
22 लाखांच्या बनावट नोटांसह दोघांना अटक : उधमसिंह नगर जिल्ह्यातील एसओजी आणि पोलिसांच्या पथकाने मिळून लाखोंच्या बनावट नोटा जप्त केल्या. पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी काशीपूर परिसरात नोटा खपवण्यासाठी आले होते. या प्रकरणाचा खुलासा करताना एसएसपी मंजुनाथ टीसी म्हणाले की, एसओजी टीमला दोन लोक काशीपूर येथे बनावट नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर एसओजी आणि काशीपूर पोलिसांनी ढेला पुलाजवळ छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून पाचशेच्या 4417 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
अशा प्रकारे बनवायचे बनावट नोटा : पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी राजेंद्र उर्फ राजू आणि बुटा सिंग अशी त्यांची नावे सांगितली. सखोल चौकशी केली असता, आरोपी राजेंद्रने सांगितले की, तो बुटा सिंगच्या साथीने सीएचसी केंद्रात स्टॅम्प पेपरवरून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापायचा. त्याने 22 लाख 8 हजार पाचशेच्या बनावट नोटा बनवण्यासाठी पाच लाखांहून अधिक स्टॅम्प पेपरचा वापर केला. एका स्टॅम्प पेपरमध्ये चार बनावट नोटा बनवायचो, असे त्याने सांगितले.