पाटणा :राष्ट्रीय लोक समता पक्ष (आरएसएलपी) आता जनता दल (युनायटेड) मध्ये विलीन होणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरएसएलपीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी दिली.
"राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी विचार करणाऱ्या लोकांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीची ही गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक समता पक्षाने जदयूमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्यासोबत उभे राहणार आहोत." असे कुशवाहा यावेळी म्हणाले.
राजदची टीका..
दरम्यान, याबाबत बोलताना राजद नेते शिवानंद तिवारी यांनी नितीश कुमारांवर निशाणा साधला. कुमारांनी आता मुख्यमंत्रीपद कुशवाहा यांच्याकडे सोपवावे, असे तिवारी म्हणाले.
कुशवाहांची घरवापसी..
कुशवाहा हे २०१३ पर्यंत जदयूचे राज्यसभा सदस्य होते. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. २०२०मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरएसएलपीने ओवैसींच्या एमआयएम, आणि मायावतींच्या बसपासोबत युती केली होती. या निवडणुकीमध्ये आरएसएलपीला एकही जागा जिंकता आली नव्हती.
हेही वाचा :'ममता बॅनर्जी नाटक करतात तर, यशवंत सिन्हांना राजकारणाचं अपचन'