राजस्थान : राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारामध्ये रिलायन्स जिओची 5G सेवा सुरू झाली आहे. शनिवारी रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी ( Reliance Jio Chairman Akash Ambani ) श्रीनाथजी मंदिरात याचे लॉन्चिंग केले. यावेळी त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर आता नाथद्वारामध्ये 5G सेवा ( 5G Service In Rajasthans Nathdwara ) सुरू झाली आहे.
Reliance Jio 5G : रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी लाँच केली जीओ 5 जी
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी ( Reliance Jio Chairman Akash Ambani ) यांनी शनिवारी राजसमंदमधील नाथद्वारा शहरातील प्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरातून राजस्थानमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा (5G Service In Rajasthans Nathdwara ) केली आहे.
वेगवान इंटरनेट वापरता येणार :नाथद्वारामध्ये 5G सेवा सुरू झाल्यामुळे आता येथील लोकांना वेगवान इंटरनेट वापरता येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनीही याच मंदिरातून 4G सेवा सुरू केली होती. मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यातच नाथद्वारा मंदिरात दर्शन घेतले होते. यादरम्यान त्यांनी या मंदिरातून 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
4G सेवा सुरू केली होती : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी ही याच मंदिरातून 4G सेवा सुरू केली होती. मुकेश अंबानी यांनी गेल्या महिन्यातच नाथद्वारा मंदिरात दर्शन घेतले होते. यादरम्यान त्यांनी या मंदिरातून 5G सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.