कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्र राज्यातही आढळत आहे. यामुळे आजपासून राज्यभर कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला दुपारी 4 वाजेपर्यंतच 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून शनिवार-रविवारी दोन दिवस रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद राहतील. सार्वजनिक स्थळे सकाळी 5 ते 9 पर्यंतच सुरू राहणार आहेत. सायंकाळी पाच वाजेनंतर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू होणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. आवश्यक यंत्रणा सुविधांसह सज्ज ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ५५० ऑक्सिजन बेड, १९० आयसीयू आणि पेडियाट्रिक वॉर्डमध्ये २५० बेड उपलब्ध असणार आहेत. या जम्बो कोविड सेंटरचे सोमवारी (दि. 28 जून) लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलानगर जंक्शन येथील बीकेसी उड्डाणपुलाजवळील सी लिंकचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार रामदास आठवले, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, मुंबई महापालिकेचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील नेते उपस्थित असतील.
मुंबई महानगरपालिकेत दुपारी अडीच वाजता मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी महापालिका निवडणूकीबाबत बोलण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हाधिकाऱ्याधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करणार आहेत.