नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येणे सुरूच आहे. गुजरातमधील अनेक जागांवर उमेदवार मोठ्या मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे समर्थक ढोल ताशांवर जल्लोष करताना दिसत आहेत. पक्ष कार्यालयासमोर लोक गरबा करताना दिसतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी फटाके फोडण्यास सुरुवात झाली आहे. (reactions on Gujarat and Himachal Pradesh election results)
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह म्हणाले, 'आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू आणि आमचे सरकार 5 वर्षे चालेल. ते (प्रतिभा वीरभद्र सिंह) मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक आहेत.