हैदराबाद- पंजाबमध्ये प्रसिद्ध कॉमेडियन भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन होत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे 'आप'च्या शर्यतीत खूप मागे आहेत. भगवंत मान हे 2011 पासून राजकारणात सक्रिय आहेत. कॉमेडियन म्हणूनही त्यांची ओळख आहे.
भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहे. त्यांच्या नेतृत्वात आपने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली आहे. आपला मोठे यश मिळवून देणाऱ्या भगवंत मान यांच्याबद्दल जाणून घेऊ. कॉमेडियन ते राजकारणी म्हणून त्यांच्या झालेल्या प्रवासावर नजर टाकू.
भगवंत मान यांचा राजकीय प्रवास हेही वाचा-Punjab Election 2022 Result : पंजाबमधील जनतेने प्रस्थापित नेत्यांना नाकारले, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह प्रकाश सिंग बादल पराभूत
लोकांच्या संमतीनंतर मान यांची मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून झाली होती निवड
भगवंत मान यांनी पंजाबच्या संगरूर विधानसभेतील धुरी या मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांनी विजय मिळविला आहे. या जागेवर भगवंत मान हे काँग्रेसचे आमदार दलवीर गोल्डी यांच्याशी लढत होते. या भागात जाट शीख मतदारांची संख्या 34 टक्के, गैर-जट शीख 5 टक्के, सवर्ण 11 टक्के, ओबीसी 15 टक्के आणि एससी मतदारांची संख्या 28 टक्के आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'आप'च्या वतीने एक नंबर जारी केला होता. त्याचबरोबर केजरीवाल यांच्या या कल्पनेला पंजाबमधील २१ लाखांहून अधिक लोकांनी मान्यता दिली. या निवडीच्या आधारावर 18 जानेवारीला 'आप'ने भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली होती.
हेही वाचा-Punjab Assembly election 2022 Results : मुख्यमंत्र्यांनतर उपमुख्यमंत्री नवज्योत सिंग सिद्धूसह प्रकाशसिंग बादल यांचा पराभव
कोण आहेत भगवंत मान?
पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सतोज गावात १७ ऑक्टोबर १९७३ रोजी जन्मलेले भगवंत मान हे वाणिज्य पदवीधर आहेत. ग्रॅज्युएशननंतर मान यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे त्यांनी नोकरी-व्यवसायापासून स्वत:ला दूर ठेवलं. कॉमेडियन म्हणून त्यांनी करियर निवडले.
हेही वाचा-Uttarakhand First Result 2022 : उत्तराखंडचा पहिला निकाल हाती, मसुरी मतदारसंघातून भाजपे गणेश जोशी विजयी
कॉमेडीचे सरताज म्हणून लोकप्रिय
भगवंत मान हे पंजाबचे प्रसिद्ध कॉमेडियन आहेत. आपल्या अप्रतिम कॉमेडीमुळे मान हे देशभर प्रसिद्ध आहेत. मान त्यांच्या देशी आणि मजेदार विनोदांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. ते व्हॉलीबॉलपटूही आहेत. मान आज पंजाबच्या राजकारणाचा मोठा चेहरा बनला आहे. येत्या काही दिवसांत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार आहेत.
अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर मान यांची अशी राहिली कॉमेडियन कारकीर्द
मान यांनी कॉलेज (शहीद उधम सिंग सरकारी कॉलेज) पासूनच कॉमेडी करायला सुरुवात केली. त्यांनी पंजाबी विद्यापीठातील विनोदी स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. मान त्यांच्या कॉमेडीत राजकारणाला जास्त टोमणे मारायचे. यानंतर मान यांनी राणा रणबीरसोबत 'जुगनू मस्त मस्त' हा टीव्ही कार्यक्रम सुरू केला. 2006 मध्ये, मान आणि जग्गी यांनी त्यांच्या 'नो लाइफ विथ वाईफ' या कॉमेडी शोने कॅनडा आणि इंग्लंडमध्ये धुमाकूळ घातला.
लाफ्टर चॅलेंजमुळे आले प्रकाशझोतात
2008 मध्ये 'ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' (2008) मध्ये भगवंत मान दिसले होते. तेव्हा मान यांच्या अप्रतिम कॉमेडीची देशभरात दखल घेतली गेली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'मैं माँ पंजाब दी' या चित्रपटात मान यांचा अभिनय दिसला होता.
पंजाबचा 'जुगनू'
भगवंत मान यांना त्यांचे कुटुंबीय जुगनू म्हणून संबोधतात. मानच्या कुटुंबीयांचा असा विश्वास आहे की तो एका जुग्गूसारखा आहे. जुग्गु म्हणजे जो सर्वत्र आपला प्रकाश पसरवतो. भगवंत मान यांनी इंद्रप्रीत कौर यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मान 2015 पासून पत्नीपासून वेगळे राहत होते.
भगवंत मान यांचा राजकीय प्रवास
मान यांच्या राजकीय प्रवासाविषयी सांगायचे तर त्यांनी २०११ मध्ये या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. मनप्रीत सिंग बादल यांच्या पंजाब पीपल्स पार्टीमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्याचवेळी पुढील वर्षी 2012 मध्ये त्यांना राज्यातील लेहरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र मान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर मान यांना काँग्रेसमध्ये आशा दिसू लागल्या होत्या. मात्र येथेही मान यांचे नाणे चालू शकले नाही. त्यानंतर 2014 मध्ये मान 'आप'च्या टीममध्ये सामील झाले. मान यांनी 2014 ची निवडणूक संगरूर लोकसभा मतदारसंघातून आपचा उमेदवार म्हणून लढवली आणि मोठ्या फरकाने जिंकली. मान यांनी येथे 2 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळविला होता.