कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. भाजपाच्या दररोज मोठ्या प्रमाणात प्रचारयात्रा आणि प्रचारसभा सुरू आहेत. यामध्येच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी दोन प्रचारयात्रा आणि दोन प्रचारसभांना संबोधित करतील.
असा असणार कार्यक्रम..
सकाळी साडे अकराच्या दरम्यान तेहट्टामध्ये शाहा एका प्रचारसभेला हजेरी लावतील. त्यानंतर कृष्णानगर उत्तरमध्ये दुपारी एकच्या सुमारास ते प्रचारयात्रेमध्ये सहभागी होतील. त्यानंतर तीनच्या सुमारास बैरकपूरमध्ये एक प्रचारयात्रा पार पडेल, आणि सायंकाळी पाचच्या सुमारास खरदाहामध्ये प्रचारसभा होणार आहे.
तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे दुपारी साडेबाराच्या सुमारास एका प्रचारसभेला संबोधित करतील. यानंतर तीनच्या सुमारास ते वर्धमानमध्ये प्रचारयात्रेत सहभागी होतील. यानंतर आणखी तीन प्रचारयात्रा पार पडणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांसोबत अन्य मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. तर, २ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
हेही वाचा :कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट; 2 हजार 167 साधूंना कोरोनाची लागण