बेंगळुरू :कर्नाटकराज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सिलिकॉन सिटी बेंगळुरू येथे मेगा रोड शो झाला. ते भाजप उमेदवारांच्यासाठी त्यांना निवडूण देण्याचे आवाहन करत आहेत. अलीकडेच बेंगळुरू उत्तर मतदारसंघातील नाइस रोड जंक्शन ते सुमनहल्ली सर्कलपर्यंत पहिला रोड शो नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी आज बंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुसरा रोड शो करत आहेत.
हात हलवत समर्थकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले : 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्व राजकीय पक्ष व्यस्त आहेत. याच अनुषंगाने पीएम मोदींनी शनिवारी २६ किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये भाग घेतला. बेंगळुरूमध्ये पीएम मोदींच्या या रोड शोमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यांचा २६.५ किमीचा रोड शो बेंगळुरूमधील बोम्मनहल्ली विधानसभा मतदारसंघातील कोनानकुंटे सोमेश्वरा सभा भवनापासून सुरू झाला आणि कडू मल्लेश्वर मंदिरात संपला. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या रोड शोमध्ये जवळपास संपूर्ण शहर भगवे झेंडे आणि कपड्यांनी झाकलेले दिसत होते. हा रोड शो 13 विधानसभा मतदारसंघातून गेला. रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या बॅरिकेड्सवर हात हलवत समर्थकांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. रोड शो दरम्यान त्यांनी म्हैसूर पेटा परिधान केला होता. रोड शोसह विविध जंक्शनवर अनेक गट आणि कलाकारांनी पारंपरिक नृत्य सादर केले.