महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

FTX Crypto Cup अरोनियनचा पराभव करत आर प्रज्ञानानंदने नोंदवला सलग चौथा विजय

आर प्रग्नानंदाने लेव्हॉन अरोनियनचा 3.1 ने पराभव केला R Pragnananda defeated Levon Aronian 3.1. जागतिक क्रमवारीत अव्वल मॅग्नस कार्लसनसह प्रग्नानंध आता 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

प्रग्नानंदा
praggnanandhaa

By

Published : Aug 19, 2022, 6:31 PM IST

मियामी: भारताच्या आर प्रज्ञानंधाने ( Chess Player R Praggnanandhaa ) एफटीएक्स क्रिप्टो कप ( FTX Crypto Cup ) बुद्धिबळात, जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या लेव्हॉन अरोनियनचा 3.1 ने पराभव करून सलग ( R Pragnananda defeated Levon Aronian 3.1 ) चौथा विजय नोंदवला. जागतिक क्रमवारीत अव्वल मॅग्नस कार्लसनसह ( Magnus Carlsen ) सतरा वर्षीय प्रग्नानंध आता 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कार्लसनने चीनच्या कुआंग लीम लीचा 3.1 ने पराभव केला. पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर तिसरा सामना प्रज्ञानानंदने जिंकला.

यानंतर चौथ्या सामन्यात 44 चालींमध्ये विजय मिळवत पूर्ण गुण मिळवले. त्याने प्रथम अलिरेझा फिरोझा, नंतर अनिश गिरी आणि हंस निमन यांचा तिसऱ्या फेरीत पराभव केला. फिरोजा प्रग्नानंध आणि कार्लसन यांच्यापेक्षा चार गुणांनी कमी असून दुसऱ्या स्थानावर आहे. आठ खेळाडूंची ही स्पर्धा चॅम्पियन्स बुद्धिबळ टूरची अमेरिकन फायनल ( Champions Chess Tour American Finals ) आहे. यामध्ये, सर्व खेळाडू एकमेकांसोबत खेळतील आणि प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 7500 डॉलर्स मिळतील.

हेही वाचा -Dhanashree And Yuzvendra पती युझवेंद्र चहलपासून विभक्त होण्याच्या अफवांवर धनश्रीने सोडले मौन, काय म्हणाली घ्या जाणून

ABOUT THE AUTHOR

...view details