हैदराबाद - नायजेरियन हॅकरने तेलंगाणा सहकारी बँकेचे 1.94 कोटी रुपये लुटले आहेत. त्यासाठी या हॅकरने तेलंगाणा सहकारी बँकेचे कोटी येथील सर्व्हर हॅक केले होते. यामागे मास्टरमाईंड असलेला व्हिलसन हा नायजेरियन नागरिक आहे. नायजेरियन व्हिलसन हा शिक्षण व रोजगारासाठी हैदराबादमध्ये आला होता.
तेलंगाणा सहकारी बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात यसीन भाषा, मोहम्मद रफी या हैदराबादमधील रहिवाशांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस मास्टरमाईंड विल्सन आणि एका महिलेचा शोध घेत आहेत.
हेही वाचा-मुलांकरिता लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात - केंद्राची उच्च न्यायालयात माहिती
असा पडला ऑनलाईन दरोडा-
सूत्राच्या माहितीनुसार विल्सनने तीन विविध नावांनी बँक खाती हैदराबादमध्ये सुरू केली. त्याने बँक सर्व्हर लॉग इन करून मोठी रक्कम खात्यावर वळविली. तेलंगाणा सहकारी बँकेतील खात्यामधून नेट बँकिंगने एका महिलेच्या खात्यावर 1.94 कोटी रुपये वळविण्यात आले आहेत. कोणताही संशय येऊ नये, याकरिता हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये एकूण 102 बँक खात्यांवर 12 जुलैपर्यंत पैसे पाठविण्यात आले आहेत. बँक खात्यामधून जास्तीत जास्त 2 लाख रुपये पाठविण्याची परवानगी होती. मात्र, आरोपीने हँकिंग करून तीन खात्यांवरील व्यवहारासाठी 2 लाख ते 6 कोटीपर्यंत पैसे पाठविण्याची मर्यादा करून घेतली. हे लक्षात येताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली.
हेही वाचा-VIDEO : हैदराबादेत काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
नायजेरियन व्यक्तींकडून होणाऱ्या गुन्ह्यांत वेगाने वाढ
पोलिसांतील सुत्राच्या माहितीनुसार नायजेरियन व्यक्तींकडून होणाऱ्या गुन्ह्यांत वेगाने वाढ होत आहे. नायजेरियन आरोपी गिफ्ट आणि लॉटरी आमिष दाखवून अनेकदा ऑनलाईन फसवणूक करत असल्याचे यापूर्वी आढळले होते.
हेही वाचा-उत्तर प्रदेशच्या कावड यात्रेला केंद्राचा सर्वोच्च न्यायालयात विरोध