नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये सहभागी राष्ट्रांना संबोधित ( pm narendra modi adress sco ) केले. पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे सरकार भारताला जगातील मोठे उत्पादन केंद्र म्हणून रूपांतरित करण्यास कटिबद्ध आहे. ट्रान्झिट अधिकारावरून ( transit Right to nation ) त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी देशांना ट्रान्झिट अधिकार देणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करताना पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला मदत पाठवण्यासाठी भारताला पारगमन अधिकार ( transit Right to nation ) मिळण्यास बरेच महिने लागल्याची माहिती यावेळी दिली.
समरकंदमध्ये उझबेकिस्तानने आयोजित केलेल्याSCO शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात, पंतप्रधान मोदी म्हणाले, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ला या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याची गरज आहे. कोविड-19 महामारी आणि युक्रेनच्या संकटामुळे, ज्यासाठी, अधिक चांगली कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, ते पुढे म्हणाले. SCO राष्ट्रांनी एकमेकांना ट्रान्झिट परवाने देण्याची देखील गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. अफगाणिस्तानात आलेल्या संकटावेळी भारताकडून मदत पाठविताना पाकिस्तानने भारताला ट्रांझिट परवाना देण्यास टाळाटाळ केली, त्या पार्श्वभूमीवर मोदींचे हे वक्तव्य आले आहे.